रोजच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्य़ेक जण नोकरी टिकवून राहण्यासाठी चाकरमानी आपल्या आरोग्याकडे सर्रासपणे डोळे झाक करतात. यामध्ये योग्य आहाराबरोबरच पुरेशी झोप न मिळणं हे आजारी पडण्यामागचं मोठं कारण होत आहे. शरीरासाठी झोप किती महत्त्वाची आहे याबाबत वोक्हार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल यांनी ऑनलाईन सर्वेक्षण केले आहे.
३० ते ५५ वयोगटातील काम करणाऱ्या मुंबईकरांवरांचं आरोग्याबाबत सर्वेक्षण करण्यात आलं आहे. एका ऑनलाईन सर्वेक्षणातून शहरातील झोपेच्या पद्धती आणि झोपेबाबत असलेल्या गैरसमजांना अधोरेखित करण्यात आले आहे. वोक्हार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे सल्लागार न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रशांत मखीजा यांच्या अंतर्दृष्टीने समर्थित या सर्वेक्षणातून केवळ झोपेच्या कमतरतेची समस्या समोर आली नाही, तर झोपेच्या आरोग्यविषयक जागरूकतेत झालेली वाढ देखील स्पष्ट झाली आहे.
१. बहुतेक मुंबईकर झोपेपासून वंचित
• ६३.५७% प्रतिसादकर्ते आठवड्याच्या दिवसांमध्ये ६ तासांपेक्षा कमी झोप घेत असल्याचे सांगतात.
• हे जागतिक आकडेवारीशी सुसंगत आहे, ज्यामध्ये शहरी भागांतील नागरिकांना काम आणि प्रवासामुळे झोपेचा त्रास होत असल्याचे दिसून येते.
याबाबत डॉ. प्रशांत मखीजा अपुऱ्या झोपेमुळे होणाऱ्य़ा समस्या सांगितल्या आहेत.
“मुंबईसारख्या महानगरांमध्ये झोपेच्या कमतरतेचा प्रसार वाढत आहे. लोक सहा तासांची झोप अपुरी समजतात, तरीही दैनंदिन गरजा त्यांना पुरेशी झोप घेण्यास अडथळा ठरतात.”
ध्वनी प्रदूषण – एक प्रमुख अडथळा
•६४.२३% लोकांनी कबूल केले की हॉर्न, बांधकाम आणि शेजाऱ्यांचा गोंगाट यामुळे झोपेवर परिणाम होतो.डॉ. मखीजा सांगतात की, अशा प्रकारचे शहरी आवाज सर्केडियन लय आणि आरईएम झोपेमध्ये अडथळा निर्माण करतात, ज्यामुळे चिंता, उच्च रक्तदाब आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होण्यासारखे गंभीर परिणाम होऊ शकतात.
३. ‘सुट्टीच्या दिवशी घेतलेी झोप’
• ५९.६२% लोकांचा समज आहे की आठवडाभर न मिळालेल्या झोपेची भर सुट्टीच्या दिवशी भरुन काढायची. डॉ. मखीजा मार्गदर्शन करताना म्हणातात की, हा एक सामान्य गैरसमज आहे. सुट्टीच्या दिवशी जास्त झोप घेतल्याने क्षणिक दिलासा मिळतो, पण सतत झोपेच्या कमतरतेचे दुष्परिणाम टळत नाहीत.”
४. आशादायक वास्तव – झोप अजूनही महत्त्वाची मानली जाते
• ७५.४०% लोक झोपेपूर्वी शांततादायक सवयी अंगीकारतात, तर केवळ २४.६०% लोक सोशल मीडियावर वेळ घालवतात.
• ५५.७४% लोक रात्री उशिरा जेवण किंवा सामाजिक कार्यक्रमांसाठी झोपेचा त्याग करत नाहीत. यावरून दिसते की, विचलित करणाऱ्या गोष्टी असूनही मुंबईकर झोपेसाठी सकारात्मक सवयी जपण्याचा प्रयत्न करतात.”
५. घोरणे – एक दुर्लक्षित धोका
५३.२३% लोक झोपेत घोरतात. घोरणं हे सामान्य समजलं जात असलं तरी ते गंभीर आजार असण्याचं संकेत आहे. घोरणे हे अनेकदा ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया (OSA) चे लक्षण असते. याकडे दुर्लक्ष केल्यास हृदयविकार, स्ट्रोक यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.
६. झोप आणि आरोग्यातील संबंध – अद्याप अस्पष्ट
• केवळ ५२.६६% लोक झोपेची कमतरता आणि मानसिक-शारीरिक आरोग्य यांचा थेट संबंध मान्य करतात.
• जवळपास ४७% लोक या नात्याबाबत अनभिज्ञ आहेत किंवा त्यांना खात्री नाही.ही माहिती चिंताजनक आहे. झोप ही केवळ विश्रांती नसून मेंदूचे आरोग्य, हार्मोनल संतुलन आणि भावनिक नियंत्रणासाठी अत्यावश्यक आहे.
७. ऊर्जेसाठी उत्तेजकांचा आधार
• ४४.८९% लोक दिवसभर सतर्क राहण्यासाठी चहा-कॉफीवर अवलंबून आहेत. उर्वरित लोक कोणत्याही उत्तेजकांशिवाय काम करतात – हा एक संतुलित चित्र आहे.
निष्कर्ष: झोपेचे महत्त्व जाणणारे, पण झोपू न शकणारे शहर
या सर्वेक्षणातून हे स्पष्ट होते की, मुंबईतील लोक झोपेचे महत्त्व ओळखतात, पण सामाजिक, पर्यावरणीय आणि व्यावसायिक अडचणीमुळे झोप घेणे कठीण बनले आहे. तीनपैकी दोन मुंबईकर झोपेपासून वंचित असल्याने सार्वजनिक आरोग्य उपाययोजना, ध्वनी प्रदूषण नियंत्रण आणि झोपेसंदर्भातील शैक्षणिक मोहिमा राबवण्याची नितांत गरज आहे.