वय वाढल्यानंतर महिलांच्या शरीरात होणारे बदल
धावपाळीच्या जीवनशैलीमुळे महिला बऱ्याचदा स्वताच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. यामुळे आरोग्यासबंधित गंभीर समस्या उदभवण्याची शक्याता असते. त्यामुळे महिलांनी नेहमी स्वताच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कामाचा वाढलेला तणाव, सतत घरातील कामे, अपूरी झोप, हार्मोनचे असंतुलन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसुन येतो. यामुळे महिलांचे मानसिक संतुलन बिघाडून जाते. मसिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मासिक पाळीमध्ये होणारे मूड स्विंग आणि प्रजनन समस्या, वाढलेले वजन, अनियमित मासिक पाळी इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात होणाऱ्या हार्मोनच्या असंतुलनामुळे आरोग्यासंबंधित कोणत्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
गर्भाशय काढल्यानंतर मासिक पाळी येते का? जाणून घ्या मासिक पाळीचा आरोग्यावर होणारा परिणाम
महिलांच्या शरीरात वयाच्या प्रत्येक टप्प्यात सतत काहींना काही बदल होतात. मात्र अनेक महिला या बदलांकडे दुर्लक्ष करतात आणि पुढे जाऊन आणखीनच गंभीर आजार होण्याची शक्यता असते. अनियमित मासिक पाळीमुळे पीसीओएसची समस्या उद्भवू शकते. हा शरीरातील हार्मोन्स संबंधित आजार आहे. या आजारामुळे अंडाशयात लहान गाठी तयार होतात, ज्यामुळे मासिक पाळी अनियमित होते आणि प्रजनन क्षमतेवर परिणाम दिसून येतो. याशिवाय या समस्येमुळे वजन वाढण्याची शक्यता असते. पीसीओएस झाल्यानंतर अनियमित मासिक पाळी, चेहऱ्यावर नको असलेले अनावश्यक केस वाढणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे.
महिलांमध्ये प्रामुख्याने दिसून येणारा आजार म्हणजे थायरॉईड. थायरॉईड झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकलदे दुर्लक्ष केल्यामुळे महिलांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. थायरॉईड झाल्यानंतर थायरॉईड ग्रंथी शरीरातील चयापचय नियंत्रित करतात. मात्र त्यात अधिक सक्रिय किंवा कमी झाल्यानंतर शरीरात बदल होऊ लागतात. थायरॉईड झाल्यानंतर अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे, थकवा, अशक्तपणा, केस गळणे, नैराश्य इत्यादी लक्षणे दिसू लाग्तात. त्यामुळे थायरॉईड झाल्यानंतर मैदा, जंक फूड इत्यादी पदार्थ खाणे टाळावे. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार घ्यावे.
वयाच्या चाळिशीनंतर किंवा तरुण वयात महिलांच्या शरीरात सतत काहींना काही बदल होतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. महिलांच्या शरीरात इस्ट्रोजेन असंतुलन झाल्यानंतर मासिक पाळीवर परिणाम होण्याची शक्यता असते. इस्ट्रोजेन असंतुलन झाल्यानंतर मासिक पाळीमध्ये जास्त रक्तस्त्राव होणे, डोकेदुखी, मायग्रेन, स्तनांना सूज येणे किंवा सतत मूड बदलणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे ही समस्या उद्भवू लागल्यानंतर नियमित व्यायाम, हर्बल सप्लिमेंट्सचे सेवन करणे आवश्यक आहे.