मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्याचे आरोग्याला होणारे फायदे आणि तोटे
वातावरणातील बदल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम दिसून येतो. आरोग्य बिघडल्यानंतर अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. शरीरात पोषक तत्वांचा अभाव निर्माण झाल्यानंतर सतत चक्कर येणे, अशक्तपणा वाटणे, उलट्या होणे, काम करण्याची इच्छा न होणे, केस गळणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. अशावेळी शरीरातील कमी झालेले कॅल्शियम किंवा इतर पोषक घटक वाढवण्यासाठी मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्यांचा आधार घेतला जातो.डॉक्टरांच्या सल्ल्याने मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या घेतल्या जातात. पण या गोळ्या खाल्ल्यानंतर शरीरावर त्याचे गंभीर परिणाम दिसून येतात. मल्टीविटॅमिन्स किंवा सपलिमेंट औषधे घेताना डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्यावा.
बाजारामध्ये विटामिन, सोडियम, झिंक, मॅग्नेशियम, आयोडीन आणि कॅल्शियम यांसारखे पोषक घटक कमी झाल्यानंतर ते पुन्हा वाढवण्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या गोळ्या उपलब्ध आहेत. या गोळ्या खाल्ल्यानंतर केस, त्वचा, नख, हाडांमधील वेदना, स्नायूंचे दुखणे, संधिवात इत्यादी अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. पण अतिप्रमाणात मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या खाल्ल्याने आरोग्यावर हळूहळू परिणाम दिसू लागतात. त्यामुळेच आम्ही तुम्हाला मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या खाल्ल्याने आरोग्याला नेमके काय फायदे आणि तोटे होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: मोड आलेल्या मुगाचे 6 जबरदस्त फायदे, लठ्ठपणा-डायबिटीसपासून मुक्ती मिळून बांधा होईल सुडौल
हे देखील वाचा: नॉर्मल डिलिव्हरीसाठी करा 5 व्यायाम, गायनोकॉलॉजिस्टने सांगितले रिकव्हरी होईल सोपी
मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्याचे आरोग्याला होणारे फायदे आणि तोटे