हार्ट फेल्युअरच्या पहिला स्टेजमधील लक्षणे
धावपळीच्या जीवनात मागील अनेक वर्षांपासून सर्वच गोष्टींमध्ये बदल झालेले दिसून येत आहे. पूर्वीच्या काळी 60 ते 70 वयोगटातील व्यक्तींना हार्ट अटॅकचा त्रास जाणवत होता. मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे वयाच्या 21 व्या वर्षांची हार्ट अटॅक येऊ लागल्याने सगळीकडे चिंता व्यक्त केली जात आहे. इतर देशांपेक्षा भारतामध्ये हार्ट अटॅक येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.कमी वयात हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, तरुण वयात हृदयविकाराचा झटका येऊ मृत्यू होणं ही गंभीर बाब आहे. पण यामागे आपण केलेल्या काही चूकच कारणीभूत आहे.
सतत बाहरचे पदार्थ खाणं, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, अपुरी झोप, सतत मोबाईल पाहणं, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा आरोग्यावर चुकीचा परिणाम दिसून येतो. तरुण पिढीचे आरोग्याकडे होत असलेले दुर्लक्ष, हे हृदयविकाराचे प्रमुख कारण आहे. हृदयाचे आरोग्य बिघडल्यानंतर अनेक समस्या जाणवतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हार्ट अटॅक आल्यानंतर पहिल्या स्टेजमध्ये नेमकी कोणती लक्षणे जाणवतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: आहाराशिवाय अचानक वजन कमी झाले आहे? मग असू शकतात ‘या’ आजारांची गंभीर लक्षणे
हृदय फेल झाल्यानंतर आरोग्यसंबंधित अनेक समस्या उद्भवतात. हृदय फेल होण्याचे चार टप्पे असतात. चौथ्या टप्प्यात हृदयाचे आरोग्य पूर्णपणे बिघडून मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यातील पहिल्या स्टेजमधून अनेक भारतीय जात आहेत. भारतीयांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. तज्ज्ञांच्या मते, A, B, C आणि D असे हार्ट अटॅक येण्याचे चार टप्पे आहेत. त्यातील C आणि D हे दोन टप्पे सगळ्यात गंभीर असतात. या दोन टप्प्यांमध्ये हृदयाचे आरोग्य पूर्णपणे बिघडण्यास सुरुवात होऊन आरोग्याची गंभीर स्थिती निर्माण होते.
हार्ट फेल्युअरच्या पहिला स्टेजमधील लक्षणे
हार्ट फेल्युअर हा पूर्वीच्या काळातील जुना आजार आहे. हा आजार झाल्यानंतर हृद्यासंबंधित समस्या उद्भवतात. हार्ट फेल्युअर झाल्यानंतर हृदयाला हवे इतके रक्त पंप करण्यास हृदय सक्षम राहत नाही. यामुळे हृदयाचे कार्य पूर्णपणे थांबते. हार्ट फेल्युअरमध्ये शरीराला आवशकता असलेल्या रक्तपेक्षा फार कमी रक्तप्रवाह होण्यास सुरुवात होते. फुफ्फुसे, पाय, पाय अशा विविध भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात होते. हे पाणी साचून राहिल्यानंतर शरीर थंड पडते.
हे देखील वाचा: 1-2 नाही तर 10 दिवस आधी मिळतात हार्ट अटॅकचे संकेत, 6 लक्षणे माहीत असायलाच हवीत
हार्ट फेल्युअरच्या पहिला स्टेजमधील लक्षणे
हार्ट फेल्युअर हा काहीवेळा अनुवांशिकतेमुळे सुद्धा उद्भवतो. या आजाराच्या पहिल्या स्टेजमध्ये हाय ब्लड प्रेशर, मधुमेह, कोरोनरी आर्टरी डिजीज, मेटाबॉलिक सिंड्रोम, संधिवाताचा ताप, कार्डियोमायोपैथी आजाराची अनुवंशिकता, ड्रग्सचे मोठ्या प्रमाणावर सेवन करणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. ही लक्षणे दिसू लागल्यानंतर हार्ट फेल्युअरचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. तसेच यामुळे शरीरातील स्नायूंना इजा पोहचते.