सततच्या धावपळीमुळे आणि कामाच्या तणावामुळे जेवणाच्या वेळा चुकून जातात. रात्री अपरात्री कधीही जेवल्यामुळे शरीरात ऍसिडिटी आणि अपचनाची समस्या वाढू लागते. ऍसिडिटी, अपचन झाल्यानंतर पचनक्रियेवर जास्तीचा तणाव निर्माण होतो. त्यामुळे जेवण आणि झोप यामध्ये २ ते ३ तासांचे अंतर असावे. रात्री उशीरा घरी येणे, उशीरापर्यंत मोबाईल किंवा टीव्ही पाहत बसल्यानंतर काहींना जेवण्याची सवय असते. पण चुकीच्या वेळी जेवल्यामुळे शरीराला हानी पोहचते. आज आम्ही तुम्हाला रात्री उशिरा जेवल्यामुळे शरीरसंबंधित कोणते गंभीर आजार उद्भवतात, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर. (फोटो सौजन्य – istock)
रात्रीच्या वेळी उशिरा जेवल्यामुळे शरीरसंबंधित उद्भवू शकतो 'या' गंभीर आजारांचा धोका, झपाट्याने वाढेल वजन

मानवी शरीर हे नैसर्गिक घड्याळ चक्र आहे. यामुळे झोप, शरीरातील ऊर्जा प्रभावित होते. जेवणाच्या वेळा वारंवार बदलल्यामुळे किंवा रात्री उशिरा जेवल्यामुळे शरीराच्या नैसर्गिक क्रियेवर परिणाम दिसून येतात.

उशिरा जेवल्यामुळे शरीरसंबंधित गंभीर आजारांची लागण होण्याची जास्त शक्यता असते. रात्री उशिरा जेवल्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि आरोग्याला हानी पोहचते. जेवणानंतर लगेच झोपल्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होत नाही.

शरीरात लठ्ठपणा वाढल्यामुळे हार्ट डिसिज, हाय ब्लड प्रेशर मधुमेह इत्यादी गंभीर आजारांची लागण होते. त्यामुळे रात्री ८ ते ९ या वेळेमध्ये जेवावे. खूप जास्त उशिरा जेवल्यामुळे शरीराच्या पचनक्रियेवर तणाव येतो.

रात्री खूप जास्त उशिरा जेवल्यामुळे एसिडीटी, छातीत जळजळ, पोट जड होणे आणि गॅस इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे उशिरा जेवण्याच्या सवयींमध्ये बदल करावा.

रात्री उशिरा जेवल्यामुळे झोपेमध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. वारंवार आंबट ढेकर किंवा पचनक्रिया बिघडल्यामुळे शरीराला हानी पोहचते.






