(फोटो सौजन्य: Pinterest)
महाराष्ट्राच्या अस्मितेचा, अभिमानाचा आणि इतिहासाचा सोनेरी दिवस म्हणजे 19 फेब्रुवारी. यंदा छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हा दिवस दरवर्षी मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे उदाहरण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात दिले जाते आणि त्यांचे नाव अभिमानाने घेतले जाते. शिवाजी महाराज हे देशभक्त तसेच कुशल प्रशासक आणि शूर योद्धा होते. त्यांनी मुघलांचा पराभव केला होता. राष्ट्राला मुघलांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी मराठा साम्राज्याचा पाया घातला. इतिहासातली सर्वात पराक्रमी राजांपैकी ते एक होते. त्यांनी कोणत्याही जाती-धर्मात कधीही भेद केला नाही ज्यामुळे त्यांना रयतेचा राजा ही पदवी देण्यात आली.
शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांचे स्मरण करून त्यांच्या जीवनकार्याची नव्याने आठवण करून दिली जाते. या खास दिनानिमित्त आज आपण या लेखात त्यांनी जिंकलेल्या काही गडकिल्यांचा इतिहास जाणून घेणार आहोत. हे गडकिल्ले महाराजांच्या पराक्रमाचे जिवंत उदाहरण आहेत. अनेक ऐतिहासिक घटनांचे हे गडकिल्ले साक्षीदार आहेत. यंदाच्या या शिवजंयतीनिमित्त आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील काही प्रमुख गडकल्ल्यांची माहिती सांगत आहोत, तुम्ही त्यांना भेट देऊन शिवजयंती साजरी करू शकता. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी जिंकलेले एकूण 365 गडकिल्ले आहेत.
chattrapati shivaji maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांना किती पत्नी होत्या? जाणून घ्या त्यांनी नावे
रायगड
किल्ल्यांचा राजा म्हणून रायगडची ओळख आहे. किल्ल्याचे नाव घेताच प्रथम रायगडाची आठवण येऊ लागते. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत हा किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार ठरला. हा किल्ला शिवाजी महाराजांनी स्वतः बांधला होता. इथेच त्यांना छत्रपती ही पदवी देण्यात आली. हा महाराजांच्या सर्वात खास किल्ल्यांपैकी एक होता. येथे तुम्ही महाराजांचे सिंहासन आणि समाधीस्थळ पाहू शकता. 1645 मध्ये महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले आणि स्वराज्याची राजधानी म्हणून त्याला घोषित केले. हा किल्ला पुण्यापासून 60 किमी अंतरावर आहे. रायगड किल्ल्याचे आधीचे नाव रायरी असे होते. हिरोजी इंदूलकर यांनी या किल्ल्याचे बांधकाम केले. हा किल्ला सुमारे साडे तीनशे वर्षे आधी बांधला होता मात्र त्याचे आजही तो तितकाच मजबूत आणि सुरक्षित आहे.
शिवनेरी
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे आहे. महाराजांचा जन्म याच किल्ल्यात झाला. दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती व पुण्यतिथीला या किल्ल्यावर आदरांजली वाहिली जाते. इ. स. 1595 मध्ये मालोजीराजे भोसले यांनी यांनी बहादूर निजामशहाकडून हा किल्ला जिंकून घेतला. त्यावेळी या किल्ल्याजवळ शिवाई देवीचे मंदिर होते. या मंदिराच्या नावावरुनच या किल्ल्याला शिवनेरी हे नाव देण्यात आले. मागेच महाराष्ट्र शासनाने इथे एक भव्य मंडप बांधला ज्यास ‘शिवकुंज’ हे नाव देण्यात आले. इथे बाल शिवाजींची पंचधातूची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे.
सिंहगड
सिंहगड किल्ल्याचा इतिहास अनेक युद्धांशी आणि ऐतिहासिक घटनांशी निगडित आहे. पुण्याजवळ सह्याद्री पर्वतात हा किल्ला बांधला आहे. हा किल्ला रणनीतीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता आणि मराठा साम्राज्य, मुघल आणि आदिलशाही यांच्यातील वादाचे केंद्र देखील होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1647 मध्ये हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. सुरवातीला याचे कोंडाणा असे होते मात्र नंतर त्याचे नाव बदलून त्याला सिंहगड हे नाव देण्यात आले. हा किल्ला तानाजी मालुसरे आणि त्यांच्या भावाने जिंकला होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावातील छत्रपतीचा अर्थ माहीत आहे का? जाणून घ्या
तोरणा किल्ला
तोरणा किल्लयाचे दुसरे नाव प्रचंडगड असे आहे. या किल्ल्याची खासियत म्हणजे महाराजांनी वयाच्या अवघ्या 16 वर्षी हा किल्ला किल्ला जिंकला होता. हा महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला आहे. इथेच मराठा साम्राज्याचा गाभा तयार झाला. या किल्लयाचे बांधकाम इ. स. 1400 मध्ये करण्यात आले असून यावर अनेक लेणी आणि मंदिरे आहेत. तोरणा किल्ल्यावर जिंकलेल्या खजिन्याचा वापर करुनच महाराजांनी रायगडाची बांधली केली. हा किल्ला पुणे शहरातील सर्वात उंच शिखरावर वसला आहे.