दागिन्यांचे सौंदर्य हे त्यांच्या झळाळीमध्ये दडलेले असते. विशेषतः चांदीचे दागिने. आपल्या चकाकीमुळे ते अनेकांचे लक्ष आपल्याकडे खेचत असते. मात्र दिसायला सुंदर असणाऱ्या या चांदीच्या दागिन्यांची झळाळी काही काळातच कमी होऊ लागते आणि ते हळूहळू काळे पडू लागतात. चांदीचे पैंजण बहुतांश महिलांची पहिली पसंती असते मात्र आपले तेज गमावल्यावर यांना वापरण्यात संकोच वाटू लागते. आपले पैंजण काळे पडले म्हणजे ते आता निरुपयोगी झाले नाही.
अनेक लोक जुन्या काळ्या पडलेल्या पैंजणांना दुकानात जाऊन त्यांना पॉलिश करतात मात्र यात आपले बरेच पैसे जातात. पण तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही घरीच एका सोप्या ट्रिकच्या मदतीने काळे पडलेले पैंजण क्षणार्धात चकचकीत करू शकता. ही सोपी घरगुती ट्रेक अवघ्या 15 मिनिटांतच तुमच्या जुन्या काळ्या पैंजणांना नव्यासारखे बनवू शकते. चला तर मग पायांची शोभा वाढवणाऱ्या पैंजणांना घरीच कसे साफ करावे ते जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – स्वयंपाक घरातील या गोष्टी आहेत विष! शरीर पोखरून काढून अनेक आजारांना आमंत्रण देतात, आजच सेवन टाळा
बेकिंग सोडा आणि पाणी
बेकिंग सोडा आणि पाण्याचा वापर करून तुम्ही चांदीचे पैंजण साफ करू शकता. पैंजण साफ करण्यासाठीचा हा एक प्रभावी मार्ग आहे. यासाठी एका बाऊलमध्ये दोन चमचे बेकिंग सोडा घ्या आणि त्यात पाण्याचा एक चमचा टाकून व्यवस्थतीत मिसळा. दोन्ही साहित्य एकत्र मिसळून याचे मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण 5-10 मिनिटे पैंजणांना लावून ठेवा आणि मग हाताने चोळून काढा. शेवटी पाण्याने पैंजण नीट धुवून काढा. यामुळे काळा रंग निघून जाईल आणि पैंजण नव्यासारखे चमकू लागतील.
लिंबू आणि मीठ
लिंबू आणि मिठाचे मिश्रण चांदीचे पैंजण साफ करण्यासाठी फार कमी येईल. यासाठी एक वाटी घेऊन त्यात लिंबाचा रस टाका. मग यात दोन चमचे मीठ टाका आणि मिसळा. दोन्ही साहित्यांची नीट पेस्ट तयार कल्यानंतर ही पेस्ट पैंजणांवर लावा आणि 5-10 मिनिटे तसेच राहूद्या. मग पाण्याने पैंजण नीट धुवून काढा. या प्रक्रियेमुळे पैंजणांवरचा काळसरपणा दूर होऊन आणि ते चमकदार बनतील.
हेदेखील वाचा – पोटावरची चरबी जाईल उडून, मांड्याही होतील कमी, या स्वस्त फळांचे सेवन करा
व्हाईट व्हिनेगर आणि बेकिंग सोडा
चांदीच्या पैंजणांचा काळपटपणा दूर कारण्यासाठी तुम्ही व्हाईट व्हिनेगर आणि बेकिंग सोडाचा वापर करू शकता. यासाठी एका भांड्यात एक चमचा वाईन व्हिनेगर आणि एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि एकत्र करा. आता ही पेस्ट काळ्या पडलेल्या पैंजणांवर लावा आणि 5-10 मिनिटे तसेच राहूद्या. नंतर पाण्याने धुवून पैंजण स्वछ करा. याच्या मदतीने पैंजणावरील काळा ठार दूर होईल.
टीप – ही माहिती केवळ वाचनाकरिता देण्यात आली आहे. कोणताही दावा आम्ही करत नाही. संकेतस्थळांवरून अभ्यास करून मिळालेल्या माहितीनुसार ही माहिती असून वाचकांच्या ज्ञानात अधिक भर घालण्याचा हा प्रयत्न आहे.