आजकालच्या धावपळीच्या युगात अनेक लोक कमी वयातच आजरांनी ग्रासलेले आहेत. याचेर मूळ कारण आपली चुकीची जीवनशैली आणि असमतोल आहार असू शकतो. आपल्या आहाराचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. त्यामुळे आपण काय खात आहोत, याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. आपल्या स्वयंपाकघरात असे काही पदार्थ आहेत, ज्यांच्या शिवाय आपले काम चालत नाही मात्र यातील बरेचसे असे पदार्थ आहेत जे आपल्या शरीरासाठी एक प्रकारचे विष ठरत असतात. यांचे सेवन वेळीच न टाळल्यास तुम्हाला गंभीर आजार होऊ शकतात. या पदार्थांमुळे आपल्याला उच्च रक्तदाब, हृदयाशी संबंधित आजार, लठ्ठपणा, मधुमेह यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागते. आज आम्ही तुम्हाला कोणते पदार्थ आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक आहेत, याविषयी सविस्तर सांगणार आहोत.
साखर
साखरेशिवाय स्वयंपाक घर हे अपूर्णच आहे. अहो, आपल्या दिवसाची सुरुवातच साखेरच्या चहाने किंवा कॉफीने होत असते. मात्र हा पदार्थ आपल्या आरोग्यासाठी एक गोड विष आहे. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण फार असते, ज्यामुळे आपले वजन वाढू शकते. त्याचबरोबर साखरेमुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होऊ शकते.जास्त साखर खाल्ल्याने टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो. साखरेचे अधिक सेवन केल्याने त्वचेच्या समस्या देखील वाढू शकतात. त्यामुळे साखरेऐवजी तुम्ही गुळाचा वापर करू शकता.
हेदेखील वाचा – पोटावरची चरबी जाईल उडून, मांड्याही होतील कमी, या स्वस्त फळांचे सेवन करा
मीठ
मीठ हे आपल्या दैनंदिन आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. पदार्थाची चव वाढवण्यास मीठ प्रमुख भूमिका बजावत असतो मात्र मीठाचे सेवनही मर्यादित प्रमाणात करावे, अन्यथा त्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. हवाबंद पदार्थ, खारट स्नॅक्स, बन्स, केक, पेस्ट्री, पॅकेज केलेले सूप आणि सॉस तसेच मसालेदार मांस यांमध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे अशा पदार्थांचे सेवन विशेष करून टाळावे.
रिफाइंड ऑइल
आपण घरात वापरत असलेले तेल हे अधिकतर बाजारतून खरेदी केले जाते, ज्यात फार प्रक्रिया केलेली असते. हे प्रक्रिया केलेले ते आपल्या आरोग्यासाठी घातक ठरत असते. प्रक्रिया केलेले तेल, विशेषत: ट्रान्स फॅट्स असलेले, हृदयरोग, स्ट्रोक आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढवू शकतात. याच्या अतिसेवनाने शरीरात जळजळ निर्माण होऊ शकते. त्यामुळे याऐवजी तुम्ही कोल्ड प्रेस्ड ऑइलचा वापर करू शकता. हे एक असे तेल असते जे मशीनमध्ये क्रश करून किंवा दाबून काढले जाते, यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही.
हेदेखील वाचा – दीर्घायुषी राहण्यासाठी चपातीच्या पिठात मिसळा हे जादुई पदार्थ! डायबिटीजचा धोका टळेल, वजन कमी होऊन पोटही साफ होईल
ब्रेड, पास्ता
सकाळच्या नाश्त्याला बहुतेकी घरात ब्रेडचे सेवन केले जाते. अनेकदा लहान मुलांच्या टिफिनमध्येही ब्रेड जॅम दिले जाते. मात्र तुम्हाला माहिती आहे का हा ब्रेड तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करत असतो. रिफाइंड कार्बोहायड्रेट्स हे जगातील सर्वात अनहेल्दी फूड्सपैकी एक आहे, सामान्यतः व्हाइट ब्रेड, पास्ता आणि मिठाईमध्ये याचे अधिक [प्रमाण आढळते. हे रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी वाढवून तुमच्या हृदयाच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. अनहेल्दी पदार्थांची लालसा कमी करण्यासाठी, तुम्ही तुमच्या आहारात ब्राउन राइस, बार्ली आणि बाजरी यासारख्या निरोगी कर्बोदकांचा समावेश करू शकता.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.