मुंबईच्या जवळपास बाईक राईड करायची आहे. पाऊस पण थांबलाय आता मग वाट कसली पाहताय. हिरवळ निघून जाण्याच्या अगोदर या सुंदर वातावरणाची अनुभूती घ्या. कारण महाराष्ट्र म्हणजे स्वर्ग! कोकण असो वा घाटमाथे, येथे बाईक राईड करण्याची मज्जाच काही ओर आहे. 'या' ठिकाणांवर बाईक राईड नक्की करा.
मुंबईच्या जवळ राईड करण्यासाठी बेस्ट रूट (फोटो सौजन्य - Social Media)

मुंबईहून लोणावळ्याकडे जाणारा रस्ता म्हणजे राइडर्ससाठी स्वर्ग! हिरवीगार दरी, धबधबे आणि घाटवाटा पावसाळ्यात तर दृश्यं स्वप्नवत वाटतात.

"मुळशी डॅमयेथे असणारा ताम्हिणी घाट रूट" हा रस्ता निसर्गप्रेमींसाठी खास आहे. वळणावळणाच्या घाटातून जाताना ढग आणि धुक्याच्या पडद्यामागून उगवणारा सूर्य दृश्य अविस्मरणीय बनवतो.

मुंबईहून मांडवा फेरीने किंवा पनवेलमार्गे अलिबागपर्यंतचा प्रवास समुद्राच्या सोबतीने. रस्त्यातील नारळाची झाडं आणि वाळूचे किनारे मन प्रसन्न करतात.

नाशिक रोडमार्गे इगतपुरीकडे जाणारा हा रस्ता खास आहे. शांत तलाव, डोंगर आणि धुक्याची चादर सकाळच्या राइडसाठी परफेक्ट स्पॉट.

राइडिंगसाठी सर्वात लोकप्रिय घाटांपैकी एक माळशेज घाट रूट! धबधब्यांचा मारा, ढगांमधून दिसणारा रस्ता आणि थंड वाऱ्याची झुळूक खऱ्या अर्थाने स्वर्गानुभूती देणारा प्रवास.






