फोटो सौजन्य - Social Media
स्वानंदी झगडे, विक्रोळीच्या चंद्रनगर भागात राहणारी साधारण मुलगी! रात्री नोकरीवरून येत असताना नजरेच्या लिंबावर नकळत तिचा पाय पडतो आणि अपेक्षेच्या पलीकडील थरार सुरु होतो. हा थरार प्रचंड भयंकर की दोन दिवसांसाठी स्वानंदीचा ताप काही कमी होण्याचे नाव घेत नाही. डॉक्टरकडे जाऊन रिपोर्ट्स काढल्या जातात पण रिपोर्ट्सपण अगदी नॉर्मल येतात.
काहीच त्रुटी नाही, काहीच नाही. पण स्वानंदी इतकी वाईट अवस्थेत असते की तिला बेडरूमपासून बाहेर पडणेही कठीण झालेले असते. तापाने फणफणलेल्या या अवस्थेत ती दोन दिवस कशीबशी काढते. शेवटी, कुटुंबीयांनाच चित्र विचित्र प्रश्न पडतात. ते त्याची खात्री करून घेण्यासाठी भगताकडे जातात. भगत म्हणतो की “या मुलीने उतारा काढलेल्या लिंबावर पाय दिला आहे. हे प्रकरण फार गंभीर आहे.”
भगत स्वतः त्यांच्या घरी येऊन मंत्रोप्चार सुरु करतो. तितक्यात स्वानंदी रूमबाहेर येऊन जोरात किंचाळू लागते. तिचे शरीर जोरजोरात कंपन पावत असते. भगत तिची अवस्था पाहून स्वतः घाबरतो आणि म्हणतो “हे प्रकरण हाताबाहेर जाण्याच्या आधी हिला एका मोठ्या ठिकाणी घेऊन जा.” तेव्हा कुटुंबीय स्वानंदीला कुर्लाच्या दर्ग्यात न्हेण्याचा विचार करतात.
चार दिवस झालेले असतात. स्वानंदीला सकाळी साडे ५ वाजताच उठवले जाते. रिक्षात बसेपर्यंत स्वानंदी तशी साधारणच असते पण ती वेळ सकाळच्या अजानाची वेळ असते. दूरवरून कानावर एक बांग ऐकू येते. मशिदीचा तो आवाज ऐकून स्वानंदीचे स्वरूप बदलते. ती किंचाळू लागते आणि कंपन पावू लागते. तिच्या कानावर हात ठेऊन तिला रिक्षात बसवले जाते. जेव्हा तो आवाज दूरवर जाऊन बंद होतो तेव्हा तिचे शरीर सुटते. दर्ग्याच्या इथे पोहचताच, स्वानंदी आत जाण्यास नकार देते. पण तिला जबरदस्ती आत आणले जाते. काही मौलाना तिच्यावर मंत्रोप्चार करून तिला तावीज देतात. तिच्या अंगातून तेव्हा भूत उतरवले जाते. हे सगळं अगदी विश्वास ठेवण्याच्या पलीकडे होते. पण हे घडले होते, खऱ्या आयुष्यात!