फोटो सौजन्य - Social Media
शुक्राचार्य म्हणजे असुरांचे गुरु! आई दैत्य असल्यामुळे शुक्राचार्यांना इंद्राने स्वर्गलोकात हिणवले आणि अतिशय तुच्छ अशी वागणूक दिली त्यामुळे शुक्राचार्य हे असुरांचे गुरु म्हणून ओळखले गेले. त्यांच्या सानिध्यात अनेक राक्षस शिकली. पण त्या काळी देव आणि दैत्यांच्या लढाईत नेहमी असुरच मारले जात होते. कारण देवांना मारणे अशक्य होते. समुद्रमंथनावेळी श्री विष्णूंनी अमृत देवांच्या कडे दिला आणि देवांनी ते प्राशन करून अमर झाले पण असुर अमर नव्हते. असुर देव लढ्यात देवांना कितीही इजा करा, देव काय मरणाऱ्यातले नव्हते. मरणारे होते ते सगळे असुरच!
शुक्राचार्यांना देवांची ही खेळी ठाऊक होती आणि या लढ्यात असुर कधीच जिंकू शकत नाही, हे ही ठाव होते त्यामुळे त्यांनी असुरांनाही अमर बनवायचे ठरवले त्यासाठी त्यांनी हजारोवर्ष झाडाला उलटे टांगून शंकराचा तप केला आणि या तपामध्ये शंकराला प्रसन्न करून संजीवनी विद्या म्हणजे अमर करण्याची कला शिकून घेतली. पण शंकराला वचन दिले की ही विद्या कधीच अधर्मासाठी वापरली जाणार नाही. पण पुढे देव-असुर लढ्यात परिणाम उलटे दिसू लागले. लढ्यात जे असुर मारले जात होते, त्यांना शुक्राचार्य आपल्या विद्येने पुन्हा जिंवत करत होते. याने पृथ्वीचे संतुलन बिघडले कारण लढ्यात कुणीही मारला जात नव्हता. सगळे देव शंकराकडे गेले आणि त्यांनी शंकराला शुक्राचार्यांच्या या कृत्याबद्दल सांगितले.
शंकरांनी त्वरित पृथ्वीकडे प्रस्थान केले आणि रागाच्या भरात शुक्राचार्यांना गिळून टाकले. शुक्राचार्य शंकराच्या पोटात अगदी काळोखात जीवन मरणाशी झुंज देत होते. त्यावेळी त्यांना शंकराच्या आतून बाहेर निघण्याचा मार्ग सापडला. शुक्राचार्य लिंगाच्या मार्फत शंकराच्या आतून बाहेर पडले. शंकर शुक्राचार्याचे हे कृत्य पाहून फार चिडले आणि त्याला मारण्यासाठी त्यांच्यामागे धावू लागले. शंकराचार्य पळत पार्वतीच्या मागे येऊन थांबले. तेव्हा पार्वतीने रागावलेल्या शंकरांना “तो तुमच्याच लिंगातून आला आहे म्हणजे तो तुमचा पुत्र आहे.” असे सांगितले आणि अशा प्रकारे शुक्राचार्य हे शुक्राणू रूपात बाहेर आल्याने त्यांना शुक्राचार्य हे नाव पडले असेही म्हंटले जाते.






