नैवेद्यासाठी नेमकं काय बनवावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा मुगाच्या डाळीचा शिरा
मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी देवीची घटस्थापना करून मनोभावे पूजा केली जाते. तसेच देवीला वेगवेगळ्या गोड पदार्थांचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो. नैवेद्यातील गोड पदार्थांमध्ये शिरा, शेवयांची खीर, तांदळाची खीर, गुलाबजाम, पुरणपोळी इत्यादी ठराविक पदार्थ कायमच बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला साजूक तुपातील मूगडाळीचा शिरा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मूगडाळीचा शिरा चवीला अतिशय सुंदर लागतो. कमीत कमी साहित्यात कोणताही गोड पदार्थ बनवायचा असल्यास तुम्ही मूगडाळीचा शिरा बनवू शकता. मुगाची डाळ सहज पचन होते. मधुमेह किंवा आरोग्यासंबंधित इतर समस्यांनी त्रस्त असलेले लोक जास्त गोड पदार्थांचे सेवन करत नाहीत. अशा रुग्णांसाठी तुम्ही मूगडाळीचा सहज पचन होणारा चविष्ट शिरा बनवू शकता. कमीत कमी साहित्यात झटपट बनवले जाणारे पदार्थ घरातील कोणत्याही कार्यक्रमांच्या दिवशी तुम्ही बनवू शकता. चला तर जाणून घेऊया मुगडाळ शिरा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






