(फोटो सौजन्य – istock)
चमकदार त्वचा मिळवून देते
कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने त्वचा खोलवर स्वच्छ होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमकही येते. कच्च्या दुधातील घटक मृत पेशींना काढून टाकण्यास प्रभावी ठरतात. यामुळे नवीन, ताजी त्वचा उघड होते. दूध त्वचेला नैसर्गिकरित्या उजळ आणि चमकदार बनवते, ज्यामुळे चेहरा तरुण दिसतो. जर तुम्हाला चमकदार त्वचा हवी असेल तर तुमच्या स्किनकेअर रुटिनमध्ये तुम्ही कच्च्या दूधाला समाविष्ट करु शकता. कच्च्या दुधातील अँटी-एजिंग गुणधर्म सुरकुत्या कमी करण्यास देखील प्रभावी ठरू शकतात.
चेहऱ्यावरील डागांना करते दूर
चेहरा खराब होऊ लागला की त्यावर अनेकदा डाग, मुरुमे दिसू लागतात. अनेकदा बाजारातील रासायनिक ब्यूटी प्रोडक्टस वापरुनही त्वचेवर काही बदल दिसून येत नाहीत अशावेळी तुम्ही चेहऱ्यावर कच्च्या दूधाचा वापर करु शकता. कच्चे दूध टॅनिंगपासून मुक्तता मिळवून देते. तुम्ही कापसाच्या मदतीने दूधाला तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता. हे दूध काही वेळ चेहऱ्यावर तसेच राहू द्या आणि मग १०-२- मिनिटांनी त्याला चेहऱ्यावरुन काढून टाका. फेसवाॅशने आपला चेहरा स्वच्छ करा.
कोरडी त्वचा मऊ होईल
वातावरणातील बदलांमुळे आपली त्वचा कोरडी आणि निर्जीव त्वचा होऊ लागते. यासाठी तुम्ही कच्च्या दूधाचा चेहऱ्यावर वापर करु शकता. कच्च्या दुधामुळे त्वचेला मॉइश्चरायझिंग मिळते, म्हणजेच तुमची कोरडी त्वचा बाळासाठी मऊ होते. एकंदरीत, कच्च्या दुधात असलेले विविध औषधी गुणधर्म तुमच्या त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात. तथापि, कच्चे दूध तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






