टॅनिंगमुळे त्वचा काळी आणि निस्तेज झाली आहे? मग १० रुपयांच्या जायफळाचा 'या' पद्धतीने करा वापर
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यासोबतच त्वचेवर सुद्धा दिसू लागतो. बऱ्याचदा थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा खूप जास्त काळी आणि निस्तेज दिसते. शरीरात निर्माण झालेल्या पाण्याच्या कमतरतेचा परिणाम त्वचेवर दिसू लागतो. त्यामुळे सर्वच ऋतूंमध्ये कायमच भरपूर पाण्याचे सेवन करावे. हिवाळ्यात पडणारे ऊन, कोरडी हवा, धूळ, मातीचे कण त्वचेमध्ये जमा होण्यास सुरुवात होते. ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स किंवा काळे डाग येऊन त्वचा खूप जास्त खराब दिसू लागते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. त्वचा कोरडी पडल्यानंतर चेहऱ्यावर टॅनिंगचे प्रमाण वाढते आणि त्वचेवर डेड स्किन जमा होण्यास सुरुवात होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जायफळचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
प्रत्येक स्वयंपाक घरात जायफळ सहज उपलब्ध होते. जेवणातील गोड पदार्थ बनवण्यासाठी जायफळचा वापर केला जातो. यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी होऊन त्वचा खूप जास्त उजळदार दिसते. जायफळचा फेसपॅक आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर लावल्यास त्वचा खूप जास्त फ्रेश आणि चमकदार दिसेल. यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन नष्ट होण्यास मदत होईल. यासाठी वाटीमध्ये जायफळ किसून घ्या किंवा बाजारात जायफळ पावडर सहज उपलब्ध होते. त्यानंतर त्यात कॉफी पावडर, हळद आणि कोरफड जेल घालून व्यवस्थित मिक्स करा.
तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसाच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. मसाज करून झाल्यानंतर ५ मिनिट फेसपॅक चेहऱ्यावर ठेवून नंतर पाण्याने स्वच्छ करून घ्या. हा फेसपॅक बनवण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास त्वचा उजळदार आणि सुंदर होईल. तसेच चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन नष्ट होण्यास मदत होईल, सुंदर दिसण्यासाठी कायमच बाजारात उपलब्ध असलेले स्किन केअर प्रॉडक्ट वापरण्याऐवजी घरगुती उपाय करावेत.
जायफळ त्वचेवर लावल्यामुळे त्वचा अतिशय सुंदर होते. याशिवाय कॉफी पावडरमध्ये नायट्रससारखे गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा झालेली घाण स्वच्छ होऊन त्वचा डिटॉक्स होण्यास मदत होते. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा हायड्रेट ठेवणे अतिशय महत्वाचा आहे. यासाठी कोरफड जेलचा वापर करावा. हळदीमध्ये ॲण्टीबॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि त्वचेच्या इतर समस्यांपासून सुटका मिळते.






