पावसाळा सुरु झाला की नवनवीन समस्या आणि आजार उद्भवू लागतात. या ऋतूतील एक सामान्य समस्या म्हणजे, आपले कपडे किंवा शूज लवकर न सुकणे. तुम्हाला माहितीच असेल की, पावसाळ्यात अनेकदा शूज धुतले की लवकर सुकले जात नाहीत. मात्र आपले घाणेरडे शूज स्वछ करणेही तितकेच महत्तवाचे आहे. अशात तुम्ही पाण्याशिवायदेखील तुमचे खराब शूज स्वछ करू शकता. आज आम्ही तुम्हाला पाण्याशिवाय शूज स्वछ कसे करावे, याची सोपी ट्रिक सांगत आहोत.
पावसाळ्यात काळेकुट्ट पडलेले पुन्हा साफ करून पूर्वीसारखे करणे फार कठीण काम आहे. त्यातही जर आपले पांढरे शूज असतील तर मग तर यांना स्वछ करणे आपल्यासाठी एक डोकेदुखी होऊन बसते. पावसाळ्यात कडक ऊन येत नसल्याने आपण कितीही पाणी आणि साबणाने शूज स्वछ केले तरी ते सुकले नाही तर आपल्याला यांचा वापर करता येत नाही. तसेच शूज जास्त वेळ ओले राहिले की यातून घाण वासही येऊ लागतो. अशात आम्ही तुम्हाला सांगतो की, शूज स्वछ करण्यासाठी तुम्हाला तुमचे शूज पाण्याने स्वछ कारण्याची काही आवश्यकत नाही यासाठी तुम्ही काही इतर पर्यायांचा वापर करु शकता.
हेदेखील वाचा – रहस्यमयी किल्ला! 800 वर्षे जुना 9 दरवाजांचा अनोखा किल्ला, इथे राजाने राणीचा शिरच्छेद केला होता…
तुमचे घाण झालेले शूज तुम्ही टूथपेस्टच्या मदतीने अगदी सहज साफ करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या शूजवर प्रथम थोडी टूथपेस्ट लावावी लागेल. यांनतर कोरड्या स्क्रबरने किंवा ब्रशच्या मदतीने तुमचे शूज स्क्रब करत राहा आणि मग ओल्या कपड्याने तुमचे शूज चांगले स्वछ करा. यानंतर त्यांना काहीवेळ पंख्याखाली सुकत ठेवा आणि कमाल पहा. तुमचे शूज पाण्याचा वापर न करता नव्याप्रमाणे चमकू लागतील.
यासाठी एक चमचा बेकिंग सोड्यामध्ये थोडे व्हिनेगर टाकून नीट मिक्स करा. आता ही पेस्ट काहीवेळ चांगली ढवळत राहा. यानंतर तयार पेस्ट तुमच्या शूजवर लावून काहीवेळ तसेच ठेवा आणि मग कापसाच्या मदतीने शूजवरून ही पेस्ट काढून टाका. असे केल्याने, तुमचे शूज नव्यासारखे चमकू लागतील.
शूज साफ करण्यासाठी तुम्ही लिंबाचा वापर करू शकता. यासाठी फक्त बेकिंग सोड्यात थोडे लिंबू घालून घट्ट पेस्ट तयार करा. आता ही तयार पेस्ट शूजवर काहीवेळ स्क्रब करा आणि मग सुक्या कापडाने शूज स्वछ करा आणि हे शूज काहीवेळ पंख्याखाली सुकत ठेवा. पाण्याचा वापर न करता या उपायांच्या मदतीने तुम्ही तुमचे शूज अगदी सहज आणि काही मिनिटांतच साफ करू शकता.