भारतीय वेधशाळेकडून (IMD) उष्णतेच्या लाटांविषयी दिल्या जाणाऱ्या धोक्याच्या सूचनांमुळे मधुमेहींसाठी काही विशिष्ट प्रकारचे धोके समोर आले आहेत. मधुमेहाचे ( Summer Diabetes Management) व्यवस्थापन ही आधीच एक तारेवरची कसरत असते, पण जेव्हा त्यात प्रचंड उष्म्याची भर पडते तेव्हा आपले आरोग्य जपण्यासाठी स्वत:हून काही पावले उचलणे अधिकच गरजेचे होते. (Summer Care For Diabetes)
मधुमेह असलेल्या व्यक्तींनी हवामान व त्याचा बदलता कल यांच्या परिणामांविषयी जागरूक असलं पाहिजे. आपल्या ग्लुकोजच्या पातळीवर सतत लक्ष ठेवणं हे त्यांचं प्राधान्य असलं पाहिजे. मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी, रक्तातील साखरेच्या पातळीवर सतत देखरेख ठेवत राहणं महत्त्वाचं असतं. विशेषत: जीवनशैलीतील बदलांमुळे ही पातळी सतत वरखाली होत असेल तर त्याबाबत जास्त दक्ष राहिले पाहिजे. (Health Article)
[read_also content=”शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, एक रुपयात पीक विमा आणि शेतकरी महासन्मान योजनेला राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची मंजुरी https://www.navarashtra.com/maharashtra/two-big-schemes-for-farmers-are-approved-in-maharashtra-cabinet-meeting-nrsr-406679.html”]
एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ. गिरीश परमार सांगतात, “एक आरोग्यपूर्ण दिनचर्या ही मधुमेहाच्या व्यवस्थापनाची गुरुकिल्ली आहे. उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये आपले दैनंदिन वेळापत्रक पार कोलमडून जाऊ शकते. परिणामी लोकांना त्यांचे मधुमेह-स्नेही डाएट जपता येत नाही किंवा ग्लुकोजची पातळी वेळच्या वेळी तपासता येत नाही. उन्हाळ्यामध्ये, विशेषत: जेव्हा उष्णतेची लाट असते तेव्हा मधुमेह असलेल्या व्यक्तींना डिहायड्रेशन म्हणजे शरीरातील आर्द्रतेचे प्रमाण कमी होण्याची शक्यता अधिक असते. विशेषत: रक्तातील ग्लुकोजची पातळी अनियंत्रित असेल तर याची शक्यता अधिकच वाढते. तेव्हा रक्तातील साखरेची पातळी सांभाळण्यासाठी योग्य संतुलन राखायचे असेल तर कन्टिन्यूअस ग्लुकोज मॉनिटरिंग (CGM) सह काही उपाययोजना लक्षात ठेवून करायला हव्यात, म्हणजे आपल्या दिनचर्येत आलेल्या अडथळ्यांमुळे मधुमेहाच्या व्यवस्थापनामध्ये व्यत्यय येणार नाही.”
रक्तातील ग्लुकोजची पातळी नियमितपणे तपासली पाहिजे
उन्हाची काहिली होणाऱ्या या मोसमामध्ये, विशेषत: मधुमेह असलेल्या व्यक्तींनी आपल्या रक्तातील ग्लुकोजची पातळी नियमितपणे तपासली पाहिजे आणि दिवसाच्या बहुतांश वेळी ही पातळी विशिष्ट अपेक्षित टप्प्यामध्ये (सर्वसाधारणपणे 70-180 mg/dl) मध्ये ठेवली पाहिजे. (CGM) सारख्या उपकरणांचा वापर करून हे सहज शक्य आहे, यात ग्लुकोजची पातळी किती आहे ते तपासण्यासाठी बोटाला सुई टोचावी लागत नाही. अशी उपकरणांमध्ये टाइम इन रेंज सारखी मापनपद्धती असते – आणि यातून मिळणारे निष्कर्ष हे बरेचदा तुम्ही इष्टतम पातळीमध्ये जास्तीत-जास्त किती वेळासाठी आहात याच्याशी संबंधित असतात, त्यामुळे ग्लुकोजवरील नियंत्रणामध्ये सुधारणा होऊ शकते.
उन्हाळ्यात पुढील 5 उपाय वापरून तुम्ही मधुमेहावर नियंत्रण ठेऊ शकता.
या काही सूचनांचे पालन करून, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन आणि मधुमेह व्यवस्थापनाची एक सर्वसमावेशक पद्धत अंगिकारून तुम्ही – अगदी उन्हाळ्याच्या मोसमातही, दिवसाच्या किमान 70% भागात ग्लुकोजची अपेक्षित पातळी राखण्याचे लक्ष्य बाळगू शकता.
उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे विश्रांती आणि दिलखुलास वागण्याचे दुसरे नाव. परंतु मधुमेहामुळे असे करणे कठीण जाऊ शकते हे खरे आहे. पण जीवनशैलीशी निगडित या आजाराचे व्यवस्थापन करण्यासाठीच्या छोट्या-छोट्या उपाययोजना करून, सोप्या क्लुप्ती वापरून तुम्ही आपल्या आरोग्याचा ताबा घेऊ शकता आणि या मोसमाचा मनमुराद आनंद घेऊ शकता.