संध्याकाळच्या नाश्त्यात चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा आलू चाट
संध्याकाळच्या वेळी सगळ्यांचं खूप जास्त भूक लागते. दिवसभर काम करून थकून आल्यानंतर काहींना काही खाण्याची इच्छा होते. अशावेळी अनेक लोक बाहेरून विकतचा नाश्ता घेऊन येतात. मात्र वारंवार तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराला खूप हानी पोहचते. कोलेस्ट्रॉल, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी गंभीर आजारांची शरीराला लागण होते. त्यामुळे नाश्त्यात कायमच घरी बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला संध्याकाळच्या नाश्त्यात खाण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये आलू चाट बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. चाट, पाणीपुरी इत्यादी चटपटीत पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. आलू चाटला उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आलू के बरुले असे सुद्धा म्हणतात. हा पदार्थ खूप कमी साहित्यात बनवला जातो. याशिवाय घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागत करण्यासाठी सुद्धा आलू चाट हा पदार्थ उत्तम पर्याय आहे. चला तर जाणून घेऊया झटपट आलू चाट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
बटाटा
लाल मिरची
मीठ
लसूण
कॉर्नफ्लावर
मैदा
बेसन
तेल
चिंच
आलं
लसूण
जिरं पावडर
चाट मसाला






