साध्या जेवणाला येईल खमंग चव! परफेक्ट प्रमाण घेऊन घरीच तयार करा वर्षभर टिकून राहणारा गरम मसाला
जेवणाची चव वाढवण्यासाठी गरम मसाल्याचा वापर कायमच केला जातो. सर्वच घरांमध्ये वर्षभर टिकून राहील इतका लाल तिखट मसाला आणि गरम मसाला बनवला जातो. गरम मारल्याशिवाय जेवणाला चांगली चव लागत नाही. घाईच्या वेळी कोणतीही साधी भाजी बनवल्यानंतर त्यात लाल तिखट आणि गरम मसाला इत्यादी ठराविक मसाले टाकले जातात. या मसाल्यांमुळे पदार्थाची चव वाढते आणि मसाल्यांचे योग्य प्रमाणात सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे सुद्धा होतात. जेवणाची चव वाढवण्यासाठी वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर केला जातो. बऱ्याचदा मसाले बाहेरून विकत आणले जातात. बाहेरून विकत आणलेल्या मसाल्यांमध्ये केमिकल्स, प्रिझर्व्हेटीव्हचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे जेवणात केमिकल युक्त मसाल्यांचा वापर अजिबात करू नये. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये घरात गरम मसाला बनवण्याची कृती सांगणार आहोत. या पद्धतीने बनवला गरम मसाला चवीला अतिशय सुंदर लागेल.(फोटो सौजन्य – istock)






