थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी झटपट बनवा डिंकवडी
हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आहारात बदल केला जातो. थंड पदार्थांचे सेवन करण्याऐवजी शरीरात उष्णता टिकवून ठेवणाऱ्या पदार्थांचे सेवन केले जाते. त्यात अतिशय आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे डिंक. डिंकाचा वापर करून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जाते. डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू आणि खोबऱ्याचे लाडू बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला डिंकाचा वापर करून सोप्या पद्धतीमध्ये डिंक वडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. डिंक खाल्ल्यामुळे शरीरात उष्णता टिकून राहते अंबी शरीराला भरमसाट फायदे होतात. आयुर्वेदात डिंक उष्ण, स्निग्ध आणि बलवर्धक गुणांनी समृद्ध मानले जाते. डिंकाच्या पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला तात्काळ ऊर्जा मिळ्वण्यासोबतच तुम्ही कायमच निरोगी राहाल. डिंक खाल्ल्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते, ज्यामुळे थंडी वाजणे, अशक्तपणा कमी होण्यास मदत होते. पाठदुखी, सांधेदुखी किंवा कंबरदुखी इत्यादी सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी डिंकाचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया डिंकवडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)






