२०२५ मध्ये भारतीयांनी गुगलवर 'या' आजारांबद्दल केले होते सार्वधिक सर्च
२०२५ हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. लवकर २०२६ या नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. वातावरणात होणारे बदल, मानसिक तणाव, आहारात निर्माण झालेली पोषक घटकांची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. बऱ्याचदा हे बदल लवकर कळून येत नाहीत. यासाठी गुगलची मदत घेतली जाते. शरीरात दिसणारी लक्षणे आणि त्यावरील उपाय शोधले जातात. गुगलवर संपूर्ण जगाची ए टू झेड माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षीसुद्धा भारतीयांनी गुगलवर वेगवेगळ्या आजारांबद्दल सर्च केले आहे. बऱ्याचदा आरोग्यासंबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यानंतर डॉक्टरांकडे जाण्याआधी गुगलवर त्या आजाराविषयी माहिती शोधली जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला २०२५ मध्ये भारतीय युजर्सनी कोणत्या आजारांबद्दल सर्वाधिक माहिती सर्च केली होती, याविषयी जाणून घेऊया सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य – istock)
Dolo चा ओव्हरडोस लिव्हरसाठी ठरेल अतिशय घातक! चुकूनही करू नका सेवन, शरीरात दिसतील ‘ही’ गंभीर लक्षणे
२०२५ मध्ये भारतीय युजर्सनी सार्वधिक सर्च केलेली समस्या म्हणजे ताप. ताप आल्यानंतर शरीराचे तापमान किती वाढते. यावरील घरगुती उपाय कोणते? याबद्दल सर्च करण्यात आले. ताप आल्यानंतर होणारी डोकेदुखी, हातापायांमधील वेदना, हातपाय सुन्न पडणे इत्यादी लक्षणांबद्दल सर्च करून माहिती मिळवली.
भारतात सर्वाधिक सर्च केला जाणारा आजार म्हणजे डोकेदुखी. हा अतिशय सामान्य आजार आहे. पण वारंवार होणाऱ्या तीव्र डोकेदुखीकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. कारण सतत होणारी डोकेदुखी गंभीर आजारांचे कारण असू शकते.
वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे, धूळ, माती आणि प्रदूषणामुळे खोकला आणि श्वसनाचे आजार वाढतात. खोकला हा साध्या धुळीपासून आणि फुफ्फुसांच्या गंभीर समस्यांमुळे होतो. याशिवाय व्हायरल इन्फेक्शन पसरल्यानंतर सगळ्यात आधी खोकल्याची साथ येते. वाढत्या खोकल्यावर आराम मिळवण्यासाठी गुगलवर अनेक घरगुती उपाय देण्यात आले आहेत. याशिवाय घशात प्रदूषण, व्हायरस, बॅक्टेरिया, ऍलर्जी, टॉन्सिलाइटिस इत्यादी कारणांमुळे जळजळ वाढते.
भारतात शरीर दुखणे, स्नायूंमधील वेदना किंवा अंग दुखणे या अतिशय सामान्य समस्या झाल्या आहेत. ही समस्या प्रामुख्याने तरुण वयातील मुलांमध्ये मोठ्याप्रमाणावर दिसून येत आहे. वारंवार स्नायू आणि सांध्यांमध्ये वाढलेल्या वेदनांकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
महिनाभर साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास शरीरावर दिसून येतात ‘हे’ सकारात्मक परिणाम, त्वचा दिसेल चमकदार
वारंवार छातीमध्ये वेदना होणे किंवा छातीमध्ये जडपणा जाणवत असेल तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. छातीमध्ये दुखल्यानंतर किंवा वेदना झाल्यानंतर लगेच हार्ट अटॅक येतो, असे अनेकांना वाटते. याशिवाय अनेकांनी उलटीचा समस्येबद्दल गुगलवर सार्वधिक सर्च केले आहे.






