Crispy Bhaji From Leftover Rice : तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही उरलेल्या शिळ्या भातापासूनही चविष्ट असे कुरकरीत भजी तयार करु शकता. यामुळे चवदार पदार्थ बनेल आणि शिळा भात वाया देखील जाणार नाही.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
अनेकदा आपल्या घरात रात्रीचा शिळा भात उरतो.
हा भात नव्या प्रकारे खायचा असेल तर तुम्ही याचे भजी तयार करु शकता.
भातापासून बनवलेले हे भजी चवीला फार छान लागतात.
घरात अनेकदा भात उरतो आणि तो पुन्हा खाण्याची इच्छा होत नाही. अशावेळी तो फेकून देण्यापेक्षा त्यापासून एखादी झटपट आणि चविष्ट डिश तयार केली, तर अन्नाची नासाडीही टळते आणि नवीन चवही अनुभवायला मिळते. उरलेल्या भाताचे पकोडे ही अशीच एक सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असलेले हे पकोडे चहासोबत खायला अप्रतिम लागतात. विशेष म्हणजे ही रेसिपी तयार करण्यासाठी फारसा वेळ लागत नाही आणि घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्यामधूनच ती बनवता येते. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही रेसिपीनक्की आवडेल.