लहान मुलांच्या डब्यासाठी बनवा केरळी पद्धतीने कोबीची भाजी
कोबीच्या भाजीचे नाव ऐकल्यानंतर अनेक लोक नाक मुरडतात. कोबीची भाजी फार कमी लोकांना आवडते. कोबीच्या भाजीचा वास उग्र येत असला तरीसुद्धा कोबीची भाजी आरोग्यसाठी गुणकारी आहे. विटामिन सी ने समृद्ध असलेल्या कोबीच्या भाजीमध्ये त्वचेचे आरोग्य सुधारण्याचे गुणधर्म आहेत. शरीरात होणाऱ्या रक्ताच्या गुठळ्या थांबवण्याचे आणि हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी कोबीच्या भाजीचे सेवन केले पाहिजे. यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. लहान मुलं कोबीपासून बनवलेले मंच्युरियन आवडीने खातात, पण मुलांना कोबीची भाजी खायला आवडत नाही. डब्यात दिलेली कोबीची भाजी पुन्हा घरी परत घेऊन येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला केरळी पद्धतीमध्ये कोबीची भाजी कशी बनवायची याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही भाजी घरातील मोठ्या व्यक्तींनासुद्धा नक्की आवडेल.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: मधुमेहाच्या रुग्णांसाठी नाश्त्याचा पदार्थ शोधताय, तर नाश्त्यासाठी बनवा गुळाचे पोहे