नाश्त्यात उरलेल्या इडलीला द्या मसाल्याचा तडका
भारतासह जगभरात सगळीकडे साऊथ इंडियन पदार्थ प्रसिद्ध आहेत. इडली, डोसा, सांबर, आप्पे, मसाला डोसा, फिल्टर कॉफी इत्यादी अनेक पदार्थांची चव घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक दक्षिण भारतामध्ये जातात. इडली सांबार सकाळच्या नाश्त्यात असलेले तर लहान मुलांसोबत मोठेसुद्धा आवडीने खातात. सकाळच्या नाश्त्यात इडली बनवल्यानंतर उरलेल्या इडलीपासून अनेक घरांमध्ये नवनवीन पदार्थ बनवले जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला संध्याकाळच्या वेळी छोटी भूक लागल्यानंतर मसाला इडली बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मसाला इडली चवीला अतिशय सुंदर लागते. वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर करून बनवलेली इडली खाल्यानंतर चवीसोबत पोटही भरेल. चला तर जाणून घेऊया मसाला इडली बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
घाईगडबडीमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा फोडणी देऊन बनवलेली ताकाची उकड, नोट करून घ्या पदार्थ
Banana Cake: मायक्रोवेव्हमध्ये नाही तर पॅनमध्ये बनवा हेल्दी-टेस्टी बनाना केक, एकदा खाल तर खातच रहाल