सोप्या पद्धतीमध्ये बनवा ताकाची उकड
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पचनास हलक्या असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. कारण वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो, ज्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. सकाळच्या नाश्त्यात अनेक घरांमध्ये कांदापोहे, उपमा, शिरा इत्यादी पदार्थ बनवले जातात. पण तेच तेच पदार्थ सतत खाल्यानंतर कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही फोडणी देऊन ताकाची उकड बनवू शकता. उन्हाळ्यात ताक प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ताक पिण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय ताक पिण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. तांदळाचे पीठ आणि ताकापासून तयार केलेला हा पदार्थ अनेकांना खाण्यास आवडत नाही. पण उकड तयार करून नंतर फोडणी दिल्यास पदार्थाची चव वाढते आणि पचनक्रिया सुधारते. चला तर जाणून घेऊया ताकाची उकड बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
पास्ता खायला आवडतो? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा Pink Sauce Pasta, झटपट तयार होईल पदार्थ
साधा डोसा खाऊन कंटाळा आला? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा रवा पालक डोसा, वाचा झटपट होणारी रेसिपी