लहान मुलांच्या डब्यासाठी बनवा पौष्टिक मुगाच्या डाळीचा पराठा
दैनंदिन आहारात डाळींचे सेवन केले जातात. ताटामध्ये भातावर जर डाळ नसेल तर जेवण जेवल्यासारखे वाटतं नाही. शिवाय डाळींचा वापर करून वेगवेगळे पदार्थ सुद्धा बनवले जातात. त्यामुळे दैनंदिन आहारात वेगवेगळ्या डाळींचे सेवन करावे, यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. तूरडाळ, मुगडाळ, मसूरडाळ, उडीद डाळ इत्यादी डाळींचा वापर करून जेवणातील पदार्थ बनवले जातात. शिवाय या डाळींमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि इतर घटक आढळून येतात. त्यातील सगळ्यात जास्त प्रमाणात वापरली जाणारी डाळ म्हणजे मूग डाळ. मुगाच्या डाळीचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. मुगाच्या डाळीमध्ये प्रथिने, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, लोह, विटामिन बी-६, नियासिन, थायामिन आणि फोलेट इत्यादी अनेक घटक आढळून येतात. (फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा
फायबर युक्त मुगाच्या डाळीचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया निरोगी राहते. शिवाय ही डाळ पचनास अतिशय हलकी असते. त्यामुळे दैनंदिन आहारात आणि लहान मुलांच्या जेवणातील पदार्थांमध्ये या डाळीचा वापर केला जातो.पण अनेकदा लहान मुलं डाळ खाण्यास कंटाळा करतात. अशावेळी तुम्ही मुलांना सोप्या पद्धतीमध्ये मुगाच्या डाळीचा पराठा बनवून देऊ शकता. मुगाच्या डाळीमध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात, जे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. चला तर जाणून घेऊया मुगाच्या डाळीचा पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा