लोहयुक्त डाळिंबापासून सोप्या पद्धतीमध्ये डाळिंब मोहितो
शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाल्यानंतर सगळ्यात आधी डॉक्टर डाळिंब किंवा लाल रंगाची फळे खाण्याचे सल्ला देतात. त्यामध्ये डाळिंब प्रामुख्याने खाल्ले जाते. डाळिंबामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. तसेच डाळिंबाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. डाळिंबाच्या फळामध्ये इतर फळांपेक्षा जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. यामुळे शरीरातील नुकसान होणाऱ्या पेशींचे संरक्षण होते.जर कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी रोजच्या आहारात डाळिंबाचे सेवन तुम्ही करू शकता. यामुळे प्रोस्टेट कर्करोगाच्या पेशी टाळण्यासाठी मदत होते. कॅन्सरने त्रस्त असलेल्या लोकांनी रोज एक ग्लास डाळिंबाचा रस पिणे गरजेचे आहे. यामुळे कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. डाळिंब सर्वच ऋतूंमध्ये उपलब्ध असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला डाळिंबापासून स्वस्तात मस्त डाळिंबाचे मोहितो कसे बनवावे, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ फार कमी वेळात तयार होतो.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: रोजच्या जेवणात करा फायबर युक्त भाजीचे सेवन, घरी बनवा लाल माठाची भाजी