संध्याकाळच्या नाश्त्यात चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा वेफर्स चाट,
लहान मुलं शाळेतून किंवा क्लासमधून आल्यानंतर त्यांना काहींना काही खाण्याची इच्छा होते. भूक लागल्यानंतर मुलांना कायमच बाहेरून विकत आणलेला वडापाव, चायनीज, पाणीपुरी, भेळ किंवा इतर पदार्थ आणून खाण्यास दिले जातात. पण कायमच मुलांना विकतचे तेलकट आणि तिखट पदार्थ खायला देण्याऐवजी घरी बनवलेले पदार्थ खाण्यास द्यावेत. यामुळे मुलांच्या शरीराला पोषण मिळेल. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला संध्याकाळच्या नाश्त्यासाठी वेफर्स चाट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ १० मिनिटांमध्ये लगेच तयार होतो. याशिवाय घरातील छोट्या मोठ्या पार्टीदिवशी किंवा कोणत्याही इतर कार्यक्रमांमध्ये तुम्ही वेफर्स चाट बनवू शकता. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चाट खायला खूप जास्त आवडते .बटाट्याचे वेफर्स चवीला अतिशय कमी तिखट आणि तेलकट असतात. त्यामुळे वेफर्सपासून तुम्ही इतर कोणताही पदार्थ सहज बनवू शकता. चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास वेफर्स चाट उत्तम पर्याय आहे. चला तर जाणून घेऊया वेफर्स चाट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
Winter Recipe : हिवाळ्यात गाजराचा हलवा बनवलात की नाही? जाणून घ्या सोपी रेसिपी






