अंगाला येणाऱ्या खाजेकडे ॲलर्जी समजून दुर्लक्ष करत असाल तर थांबा! लिव्हर आतून सडल्यानंतर दिसून येतात 'ही' लक्षणे
लिव्हर खराब होण्याची कारणे?
अंगाला सतत खाज कशामुळे येते?
लिव्हर खराब झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
सतत येणाऱ्या घामामुळे किंवा वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे काहीवेळा अंगाला खाज येणे, त्वचा लाल होणे, त्वचेवर पुरळ येणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. पण वारंवार तुमच्या अंगाला खाज येत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. शरीरात होणाऱ्या अंतर्गत बदलांमुळे अंगाला खाज येते. ॲलर्जी, कोरडी त्वचा, तणाव किंवा मधुमेह यांसारख्या गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर सुद्धा अंगाला खूप जास्त खाज येते. जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम शरीरावर दिसून येतो. आहारात होणारे बदल, अपुरी झोप, पोषक घटकांची कमतरता, कामाचा तणाव इत्यादी अनेक गोष्टींमुळे आरोग्य पूर्णपणे बदलून जाते. त्यामुळे शरीरसंबंधित दिसणाऱ्या लक्षणांकडे लक्ष देऊन आरोग्याची योग्य काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य – istock)
शरीराच्या मज्जासंस्थेतील संवेदनांमुळे त्वचेला खाज येते. त्वचेवर वाढलेल्या कोरडेपणामुळे आणि शरीराच्या आतील बदलांमुळे काहीवेळा अंगाला खाज येण्याची जास्त शक्यता असते. लिव्हर शरीरासाठी अतिशय महत्वाचे आहे. पण लिव्हरच्या कार्यात बिघाड झाल्यानंतर शरीरातील घाण बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तशीच साचून राहते. लिव्हरमध्ये साचून राहिलेल्या विषारी घाणीमुळे अंगाला खाज येते. याला सिस्टेमिक इचिंग असे सुद्धा म्हणतात. या खाजेवर कोणतेही उपचार केल्यास त्याचा फारसा फायदा होत नाही. त्यामुळे वारंवार तुमच्या अंगाला खाज येत असेल तर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. चला तर जाणून घेऊया लिव्हर खराब झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे.
लिव्हरच्या कार्यात अडथळे आल्यानंतर रक्तातील बायल साल्ट्स वाढत जाते, ज्यामुळे त्वचेवर जखमा सुद्धा होऊ शकतात. लिव्हरमुळे खाज येत असेल तर त्वचेवर कोणतीही पुरळ किंवा चट्टे दिसून येत नाही. शरीराच्या आतमध्ये झालेल्या बिघाडामुळे तळहात आणि तळपायांवर जास्त खाज येण्याची शक्यता असते. लिव्हरच्या समस्येमुळे शक्यतो खाज रात्रीच्या वेळी आणि जास्त उष्णता वाढल्यानंतर येते. लिव्हर खराब झाल्यानंतर लघवीचा रंग गडद होणे, डोळे पिवळे होणे किंवा शरीरात जास्त थकवा जाणवू लागतो.
पुरळ किंवा जास्त लाल चट्टे
तळहात, तळपाय किंवा संपूर्ण शरीरावर पुरळ
त्वचा पिवळी पडणे
भूक न लागणे
झपाट्याने वजन कमी होणे
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर अंगाला खूप जास्त खाज येते. मात्र सामान्य समस्या समजून दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अंगाला येणाऱ्या खाजेपासून सुटका मिळवण्यासाठी थंड पाण्याने अंघोळ करावी. तसेच वारंवार खाज येणाऱ्या भागाला बर्फाने शेक घ्यावा. यामुळे त्वचेमध्ये थंडावा वाढतो. उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये आरामदायी कपडे परिधान करावेत. सैल सुती कपडे घातल्यामुळे अंगाजवळील हवा खेळती राहते.
Ans: हो, काही वेळा सतत येणारी खाज ही लिव्हरच्या समस्यांचे संकेत असू शकते, विशेषतः जेव्हा त्वचेवर पुरळ नसते.
Ans: लिव्हर नीट कार्य करत नसल्यास शरीरात पित्तद्रव्य (bile salts) साचतात, त्यामुळे त्वचेवर खाज येऊ शकते.
Ans: त्वचा पिवळी होणे (जॉन्डिस), थकवा, भूक न लागणे, पोट फुगणे आणि गडद रंगाची लघवी ही लक्षणे दिसू शकतात.






