फोटो सौजन्य: Freepik
सध्या जगभरात कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. यात आता हळूहळू तरुणांची संख्या सुद्धा वाढत आहे. अशावेळी आयआयटी कानपूर मधील विध्यार्थ्यानी एक असे उपकरण बनवले आहे, ज्यामुळे अवघ्या एका मिनिटात तोंडातल्या कॅन्सर ओळखता येणार आहे. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
आता फक्त एका मिनिटात तुम्हाला कॅन्सर आहे की नाही हे कळणार आहे. IIT कानपूरने एक अद्भूत उपकरण तयार केले आहे जे अवघ्या 60 सेकंदात अहवाल देईल. हे उपकरण केवळ तोंडाचा कर्करोग शोधण्यासाठी मर्यादित असणार आहे. हे उपकरण तोंडाच्या आतील भागाचे फोटो घेईल आणि त्याचे विश्लेषण करून लगेच झटपट अहवाल देईल.
या उपकरणाद्वारे कॅन्सर कोणत्या स्टेजमध्ये आहे हे देखील कळण्यास मदत आहे. हे उपकरण केमिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रा. जयंतकुमार सिंग यांच्या मदतीने स्कॅन जिनी कंपनीने ते तयार केले आहे. या वर्षी डिसेंबरपर्यंत ते बाजारात येण्याची शकता आहे. चला जाणून घेऊया, हे उपकरण कितपत प्रभावी ठरू शकते आणि त्याची किंमत किती असू शकते.
हे उपकरण प्रो. जयंत कुमार सिंग आणि त्यांच्या टीमने 6 वर्षात तयार केले आहे. हे एक पोर्टेबल उपकरण आहे, जे एका छोट्या पिशवीत सुद्धा मावेल. तसेच ते कुठेही नेले जाऊ शकते. कानपूरमध्ये अनेक ठिकाणी शिबिरे लावून सुमारे 3 हजार लोकांवर त्याची चाचणीही घेण्यात आली आहे. या उपकरणाने एका 22 वर्षांच्या तरुणांमध्ये सुद्धा कर्करोग दाखवला आहे. कारखान्यातील कामगार आणि खाजगी नोकरी करणारे लोकही या चाचणीत सहभागी झाले होते.
प्रो. जयंतने सांगितले की, उपकरणाचा आकार टूथब्रशएवढा आहे. यात उच्च दर्जाचा कॅमेरा आणि एलईडी फिट केले आहे. हे स्मार्टफोन, टॅबलेट किंवा आयपॅडशी देखील कनेक्ट केले जाऊ शकते. तोंडाच्या आत फोटो काढल्यानंतर कॅमेरा सविस्तर अहवाल मोबाईलवर पाठवेल. या अहवालाचा निकाल हा 90% अचूक आहे. तसेच त्याच्या चाचणीमध्ये कोणताही त्रास होत नाही.
प्रो. जयंतने सांगितले की, तोंडाचा कर्करोग शोधण्यासाठी या उपकरणाची किंमत अंदाजे दीड लाख ते दोन लाख रुपयांपर्यंत असू शकते. त्यात वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तू परदेशातून आयात कराव्या लागतात, त्यामुळे त्याची किंमत जास्त आहे. एका यंत्राद्वारे किमान 5 लाख लोकांची चाचणी केली जाऊ शकते. तर एका दिवसात सुमारे 300 लोकांची चाचणी केली जाऊ शकते. हे उपकरण बाजारात येण्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती घडून येऊ शकते.