हिवाळ्यात आजारांपासून होईल शरीराचे रक्षण, सकाळच्या नाश्त्यात प्या हेल्दी टेस्टी Garlic Vegetable Soup
थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला उष्णतेची आवश्यक असते. कारण वातावरणात असलेल्या गारव्याचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सर्दी, खोकला, ताप इत्यादी साथीच्या आजारांची लागण झाल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. याशिवाय वारंवार आजारी पडल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होण्यासोबतच शरीरात कायमच थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. अशावेळी कोणत्याही गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी घरगुती पदार्थांचे सेवन करून शरीराची ऊर्जा वाढवावी. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये गार्लिक व्हेजिटेबल सूप बनवण्याची सोपी रेसिपी रेसिपी सांगणार आहोत. लसूण खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेल्या घटकांमुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात, सर्दी खोकल्यापासून सुटका होते आणि घशात वाढलेली खवखव कमी होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया गार्लिक व्हेजिटेबल सूप बनवण्याची कृती. (फोटो सौजन्य – istock)
जेवणात तोंडी लावण्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा काठीयावाडी लसूण चटणी, नोट करून घ्या झणझणीत रेसिपी






