• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Iron Deficiency Crisis Among Urban Women Needs Urgent Treatment

शहरी भागातील महिलांमध्ये लोहाची कमतरता होण्याचे संकट, त्वरीत उपचार करणे आवश्यक

Women Iron deficiency: शहरी महिला, लोकसंख्येतील असा भाग जो आरोग्याच्या बाबतीत जागरूक आणि सक्रिय असल्याचा अभिमान बाळगतो, त्यांच्यामध्ये लोहाची कमतरता त्यांच्यामध्ये मूक साथीच्या रूपात लोहाची कमतरता हा आजार उदयास येताना दिसत आहे. सध्या महिलांमध्ये लोहाची अधिक कमतरता आढळून येत असून अधिक माहिती जाणून घेऊया.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 05, 2024 | 01:28 PM
महिलांमध्ये लोहाची कमतरता

महिलांमध्ये लोहाची कमतरता

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

उत्तम आरोग्यसेवा आणि पोषक आहाराची उपलब्धता यासारखे शहरांमध्ये राहण्याचे फायदे असूनही, बऱ्याच शहरी स्त्रिया आयर्न डेफिशियन्सी अ‍ॅनिमियाने (IDA) ग्रस्त आहेत. लोहपातळी कमी होणे हे या रोगाचे मुख्य लक्षण आहे,  ज्यामुळे हिमोग्लोबिनचे उत्पादन कमी होऊन त्याचा जीवनाच्या गुणवत्तेवर आणि उत्पादकतेवर लक्षणीय परिणाम होतो. 

या आरोग्य समस्येकडे लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे, कारण त्याचे व्यक्ती आणि समाजावर दूरगामी परिणाम होत आहेत. महिलांमध्ये ही कमतरता अधिक प्रमाणात वाढत असून शहरी भागातील महिलांवर अधिक परिणाम होताना दिसतोय. डॉ. कुणाल सहगल, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य पॅथॉलॉजिस्ट, न्यूबर्ग सहगल पथ प्रयोगशाळा यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

समस्येची व्याप्ती

जीवनशैली आणि काही विशिष्ट शारीरिक घटकांमुळे स्त्रियांना आयर्न डेफिशियन्सी अॅनिमियाचा त्रास होतो. गर्भधारणा होऊ शकणाऱ्या वयातील महिलांना मासिक पाळीत होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे धोका वाढतो, ज्यामुळे कालांतराने लोहाचे साठे कमी होऊ शकतात. गर्भधारणेमुळे हा धोका आणखी वाढतो, कारण गर्भाच्या विकासास आणि मातेच्या आरोग्यासाठी लोहाची मागणी वाढते. 

चुकीच्या सवयींमुळे वाढ 

लोहाची कमतरता चुकींच्या सवयींमुळे

लोहाची कमतरता चुकींच्या सवयींमुळे

याव्यतिरिक्त, शहरी जीवनशैलीतील चुकीच्या आहार सवयींमुळे देखील त्रास होण्याची शक्यता वाढते प्रक्रिया केलेले अन्न ज्यामध्ये लोह तसेच इतर आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असते, त्याच बरोबर शहरातील धकाधकीचे जीवन ज्यामुळे संतुलित आहार बनविण्यासाठी वेळ मिळत नसल्याने समस्या अधिकच वाढते.

लक्षणे आणि परिणाम

IDA ची लक्षणे बऱ्याचदा सहज लक्षात न येणारी असतात, त्यामुळे ती व्यस्त शहरी जीवनशैलीचा परिणाम मानली जातात. थकवा, अशक्तपणा आणि एकाग्र होण्यामध्ये समस्या, या अष्टपैलूची भूमिका निभावणाऱ्या शहरी स्त्रियांच्या सामान्य तक्रारी आहेत. 

तथापि, ही लक्षणे लोहाच्या कमतरतेचे मुख्य सूचक देखील आहेत. इतर लक्षणांमध्ये त्वचेचा फिकटपणा, श्वासोच्छवासाचा त्रास, चक्कर येणे आणि नखे ठीसुळ होणे यांचा समावेश आहे. यावर उपचार न केल्यास, आयडीएमुळे हृदयाच्या समस्या, गर्भधारणे दरम्यान येणाऱ्या समस्या आणि बौद्धिक कामात समस्या यासारख्या गंभीर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

हेदेखील वाचा – शरीरात जाणवते लोहाची कमतरता? तर आहारात करा ‘या’ गुणकारी पदार्थांचे करा सेवन

काय आहे प्रभाव 

आयडीएचा प्रभाव वैयक्तिक आरोग्यापलीकडील असू शकतो. लोहाच्या कमतरतेमुळे कार्यक्षमता कमी होऊ शकते तसेच सुट्ट्यांचे प्रमाण वाढू शकते. नोकरी करणाऱ्या मातांसाठी, या रोगामुळे त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्याच्या आणि त्यांच्या व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकते. कार्यक्षमतेवर होणारा परिणाम यामुळे होणारे नुकसान आणि उपचारांवरील खर्च, यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान संभवते.

संकटाला सामोरे जाणे

शहरी महिलांमधील लोहाच्या कमतरतेच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी बहुआयामी दृष्टीकोन आवश्यक आहे. जागरूकता ही पहिली पायरी आहे. बऱ्याच स्त्रियांना त्यांच्या शरीरातील लोहाचे प्रमाण आणि लोहाची पातळी पुरेशी ठेवण्याचे महत्त्व माहित नसते. लोहाच्या कमतरतेची लक्षणे, कारणे आणि परिणामांविषयी जागरूकता वाढविण्यात सार्वजनिक आरोग्य मोहीम आणि शैक्षणिक पुढाकार महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.

आहाराच्या सवयी 

आहाराच्या चुकीच्या सवयीमुळे कमतरता भासते

आहाराच्या चुकीच्या सवयीमुळे कमतरता भासते

आहाराच्या सवयी सुधारणे अत्यावश्यक आहे. महिलांनी आपल्या आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करावा. यामध्ये लीन मीट्स, मासे, शेंगदाणे, हिरव्या पालेभाज्या आणि लोहयुक्त कडधान्ये यांचा समावेश आहे. त्याच बरोबर लिंबूवर्गीय फळे आणि टोमॅटो यासारख्या मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांची जोडणी केल्याने लोहाचे शोषण वाढू शकते. 

शाकाहारी आणि वेगन आहार घेणाऱ्या लोक, शाकाहारी लोकांमध्ये लोहाची जैव उपलब्धता कमी झाल्यामुळे जास्त धोका असू शकतो, आहारातील संतुलन आणि पूरकतेकडे लक्ष देणे विशेषतः महत्वाचे आहे.

IDA उपचार 

आयडीएचे लवकर निदान आणि उपचारात डॉक्टरांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. नियमित तपासणी केल्याने लोहाच्या कमतरतेचे प्रमाण गंभीत होण्याआधी कमतरता लक्षात येण्यास मदत होऊ शकते, विशेषत: गर्भधारणा होऊ शकणाऱ्या वयातील महिला आणि गर्भवती महिलांसाठी. आवश्यक असल्यास, परिणामकारकतेसाठी आणि संभाव्य साइड इफेक्ट्स टाळण्यासाठी लोह पूरक पदार्थ सेवन करण्याचा आणि चाचण्या करण्याचा सल्ला देणे आवश्यक आहे.

हेदेखील वाचा – शरीरात वाढेल त्वरीत हिमोग्लोबिन, 7 फळं ठरतील वरदान

काय करावे?

शहरी महिलांमध्ये लोहाची कमतरता ही एक अशी आरोग्य समस्या आहे ज्याकडे त्वरीत लक्ष देण्याची गरज आहे. जागरूकता वाढवून, निरोगी आहार पद्धतींना प्रोत्साहन देऊन आणि नियमित वैद्यकीय तपासणी करून आपण या मूक साथीचा प्रभावीपणे सामना करू शकतो. आपल्या समुदायाच्या चैतन्यशीलतेसाठी आणि एकूणच सामाजिक-आर्थिक रचनेचे कल्याण लक्षात घेऊन शहरी महिलांच्या आरोग्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे. या समस्येचे निराकरण केल्याने केवळ वैयक्तिक आरोग्य परिणामच सुधारत नाहीत तर उत्पादकता आणि जीवनाची गुणवत्ता देखील वाढवते आणि निरोगी आणि अधिक समृद्ध समाजात योगदान देते.

Web Title: Iron deficiency crisis among urban women needs urgent treatment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2024 | 01:28 PM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

Couple Weight Gain: लग्नानंतर का वाढते नवरा-बायकोचे वजन, शरीरसंबंध की अजून काही कारण? जाणून घ्या तथ्य
1

Couple Weight Gain: लग्नानंतर का वाढते नवरा-बायकोचे वजन, शरीरसंबंध की अजून काही कारण? जाणून घ्या तथ्य

Constipation Home Remedy: आता शौच होणार नाही कडक; लावावा लागणार नाही जोर; 10 रूपयात मिळाला देशी जुगाड
2

Constipation Home Remedy: आता शौच होणार नाही कडक; लावावा लागणार नाही जोर; 10 रूपयात मिळाला देशी जुगाड

तुमचे लिव्हर सडले आहे का? शरीर देतो ‘हे’ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष अन्यथा मृत्यू देईल भेट
3

तुमचे लिव्हर सडले आहे का? शरीर देतो ‘हे’ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष अन्यथा मृत्यू देईल भेट

हातात दिसले ‘हे’ 5 बदल तर व्हा सावध! Liver Damage चे संकेत करू नका दुर्लक्ष
4

हातात दिसले ‘हे’ 5 बदल तर व्हा सावध! Liver Damage चे संकेत करू नका दुर्लक्ष

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भारतीय विद्यार्थ्यांचा ChatGPT वापर पाहून OpenAI सुद्धा झालं चकित! उघड झालं मोठं गुपित, चॅटबोटला विचारले जातात हे प्रश्न

भारतीय विद्यार्थ्यांचा ChatGPT वापर पाहून OpenAI सुद्धा झालं चकित! उघड झालं मोठं गुपित, चॅटबोटला विचारले जातात हे प्रश्न

Oct 28, 2025 | 10:34 AM
‘एक ही दिल कितनी बार जीतोगे हिटमॅन…’ ऑस्ट्रेलियामध्ये धूमाकुळ घातल्यानंतर रोहित शर्मा मायदेशात परतला! पहा Video

‘एक ही दिल कितनी बार जीतोगे हिटमॅन…’ ऑस्ट्रेलियामध्ये धूमाकुळ घातल्यानंतर रोहित शर्मा मायदेशात परतला! पहा Video

Oct 28, 2025 | 10:31 AM
Uttar Pradesh Crime : १२ वर्षीय मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापला, गळा चिरला नंतर…,अत्यंत क्रूरपणे करण्यात आली हत्या

Uttar Pradesh Crime : १२ वर्षीय मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापला, गळा चिरला नंतर…,अत्यंत क्रूरपणे करण्यात आली हत्या

Oct 28, 2025 | 10:26 AM
Nagpur Crime News: नागपुरात साताऱ्याची पुनरावृत्ती; पोलिसाकडून २३ वर्षीय तरुणीवर लैंगिक छळ

Nagpur Crime News: नागपुरात साताऱ्याची पुनरावृत्ती; पोलिसाकडून २३ वर्षीय तरुणीवर लैंगिक छळ

Oct 28, 2025 | 10:25 AM
Food Recipe: लहान मुलांच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चमचमीत मसाला टिक्की पाव, पदार्थ पाहून मुलांना होईल आनंद

Food Recipe: लहान मुलांच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चमचमीत मसाला टिक्की पाव, पदार्थ पाहून मुलांना होईल आनंद

Oct 28, 2025 | 10:14 AM
Cyclone Montha: चक्रीवादळ मोंथाचा Landfall, वेगाने सरकरणार आंध्रप्रदेशमध्ये; शाळा-कॉलेजला सुट्टी, अनेक ट्रेन्स रद्द

Cyclone Montha: चक्रीवादळ मोंथाचा Landfall, वेगाने सरकरणार आंध्रप्रदेशमध्ये; शाळा-कॉलेजला सुट्टी, अनेक ट्रेन्स रद्द

Oct 28, 2025 | 10:09 AM
Women’s World Cup : लीग टप्प्यानंतर टॉप 5 फलंदाज कोणते? भारताचे दोन बॅट्समन यादीत सामील

Women’s World Cup : लीग टप्प्यानंतर टॉप 5 फलंदाज कोणते? भारताचे दोन बॅट्समन यादीत सामील

Oct 28, 2025 | 10:05 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ambernath : अंबरनाथ पश्चिमेला शास्त्रीनगर भागात पाणीटंचाई, स्थानिक नागरिक संतप्त

Ambernath : अंबरनाथ पश्चिमेला शास्त्रीनगर भागात पाणीटंचाई, स्थानिक नागरिक संतप्त

Oct 27, 2025 | 06:59 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या शनी मारुती मंदिरात ५६ पदार्थांचा महाभोग

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या शनी मारुती मंदिरात ५६ पदार्थांचा महाभोग

Oct 27, 2025 | 06:54 PM
Raigad : सुनील तटकरे यांनी खोपोलीत निवडणूकीचे रणशींग फुंकले

Raigad : सुनील तटकरे यांनी खोपोलीत निवडणूकीचे रणशींग फुंकले

Oct 27, 2025 | 06:45 PM
Virar Chhath Puja : कोर्टाच्या आदेशानंतर सर्व पक्षीय बैठक, प्रशासनाकडून छट पूजे बाबत मोठा निर्णय

Virar Chhath Puja : कोर्टाच्या आदेशानंतर सर्व पक्षीय बैठक, प्रशासनाकडून छट पूजे बाबत मोठा निर्णय

Oct 26, 2025 | 08:04 PM
Wardha : वर्ध्यात साकारण्यात आली ‘किल्ले लोहगड’ ची आकर्षक प्रतिकृती

Wardha : वर्ध्यात साकारण्यात आली ‘किल्ले लोहगड’ ची आकर्षक प्रतिकृती

Oct 26, 2025 | 07:57 PM
Election : ऑल इंडिया ख्रिश्चन फोरम कडून मोर्चे बांधणीला सुरुवात

Election : ऑल इंडिया ख्रिश्चन फोरम कडून मोर्चे बांधणीला सुरुवात

Oct 26, 2025 | 07:42 PM
Raju Shetti : कायदा – सुव्यवस्थेवरून राजू शेट्टींनी केला गृहमंत्र्यांवर हल्लाबोल

Raju Shetti : कायदा – सुव्यवस्थेवरून राजू शेट्टींनी केला गृहमंत्र्यांवर हल्लाबोल

Oct 26, 2025 | 07:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.