फोटो सौजन्य - Social Media
जर तुमच्या जोडीदाराच्या वागण्यात आणि जीवनशैलीत अचानक मोठा बदल दिसत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. जर त्यांचे संवाद कमी झाले असतील, ते तुमच्यासोबत क्वचितच इंटिमेट होत असतील किंवा Eye Contact शिवाय बोलत असतील, तर हा एक रेड फ्लॅग असू शकतो. अनेकदा नात्यात दुरावा आला की संवाद कमी होतो आणि पार्टनर कारण नसताना त्रासलेला किंवा अस्वस्थ दिसतो. जर तो वारंवार कामाचा किंवा थकव्याचा बहाणा करत असेल आणि तुमच्याशी पूर्वीसारखे बोलत नसेल, तर हे लक्षात घेण्यासारखे आहे.
जोडीदाराच्या वागणुकीत अचानक नकारात्मक बदल झाले असतील, तर ते धोका असू शकतो. जर तो तुमच्यावर उगाच चिडचिड करत असेल, वाद घालण्याचे कारण शोधत असेल किंवा तुमच्यावर दबाव टाकत असेल, तर यामागे काहीतरी कारण असू शकते. अनेकदा असे लोक आपल्या जोडीदाराला कमी लेखतात, त्यांच्यावर राग काढतात आणि त्यांच्याशी दुरावा ठेवतात. जर तुमचा जोडीदार वारंवार तुमच्याशी टाळाटाळ करत असेल, तर याबाबत तुम्ही स्पष्ट चर्चा करणे गरजेचे आहे.
जर त्याच्या दिनचर्येत मोठे बदल दिसत असतील, जसे की तो नेहमीपेक्षा जास्त वेळ बाहेर राहत असेल, अचानक स्वतःकडे अधिक लक्ष देत असेल, कपड्यांच्या स्टाईलमध्ये बदल करत असेल किंवा सतत फोनवर व्यस्त राहत असेल, तर हे संशयास्पद ठरू शकते. काही लोक सोशल मीडियावर गुप्त अकाउंट तयार करतात, अनोळखी नंबरवरून वारंवार मिस्ड कॉल येऊ लागतात आणि जोडीदार त्यांच्या वस्तू हाताळण्यास मनाई करतो, तर हा एक धोका असू शकतो. जर तो तुमच्यासोबत वेळ घालवण्याऐवजी सतत कामाचा बहाणा करत असेल आणि घरातील जबाबदाऱ्या टाळत असेल, तर त्याच्या वागणुकीकडे लक्ष द्या.
मात्र, हे सर्व संकेत दिसले तरीही घाईघाईने निष्कर्ष काढू नका. प्रत्येक नात्यात कधी ना कधी बदल होतात, पण याचा अर्थ प्रत्येक बदलाचा धोका आहे असे नाही. त्यामुळे, जोडीदाराच्या वागणुकीवर लक्ष ठेवा, पण कोणताही निर्णय घेण्यापूर्वी शांतपणे विचार करा. जर तुमच्या मनात शंका असेल, तर त्याच्याशी थेट चर्चा करा. चूक समजल्यास नात्यात सुधारणा होऊ शकते, पण चुकीचा आरोप केल्यास संबंध बिघडू शकतो. त्यामुळे, नाती टिकवण्यासाठी संवाद आणि विश्वास महत्त्वाचा आहे.