सणावाराला पारंपरिक लुक आणि दागिने हा महिलांचा सर्वात आवडीचा विषय. मराठी नववर्षाची सुरुवात म्हणून गुढीपाडव्याचा सण अगदी आनंदाने सादरा केला जातो. या मराठमोळ्य़ा सणानिमित्ताने तुम्ही खास पारंपरिक मराठी दागिने परिधान करु शकता ज्याने तुमच्या सौंदर्यात आणखीनच भर पडेल.
चिंचपेटी : हा सर्वात जुना आणि पारंपरिक दागिन्यांच्या प्रकारातील एक आहे. असं म्हणतात की, शोध सोळाव्या शतकात चिंचपेटीचा शोध लागला. चिंचेच्या आकाराच्या दिसणाऱ्या या पेट्यांची नक्षी असल्याने याला चिंचपेटी म्हणतात.
काटपदराची साडी किंवा नऊवारी साडीवर खूप जास्त दागिने घालण्यापेक्षा चिंचपेटी परिधान केल्याने छान लुक येतो. पेशवाई काळात या दागिन्याला फार महत्त्व होते.
कोल्हापुरी साज : हा अत्यंत लोकप्रिय असा दागिन्याचा प्रकार आहे. पुर्वीच्या राजघराण्यातील स्त्रिया कोल्हापुरी साज परिधान करत असे. या गुढीपाडव्याला मराठमोळ्या लुकसाठी कोल्हापुरी साज परिधान केल्याने सौंदर्यात भर पडेल.
नागोत्र : बाजूबंद या प्रकारातील सर्वात जुना असा दागिना म्हणजे नागोत्र . हा दागिना असून तो नागाच्या वेटोळ्याच्या आकाराप्रमाणे दिसणारा अत्यंत दुर्मिळ असा आहे.
गोठ : पाटल्या, तोडे यांप्रमाणे गोठ या बांगड्यांचा प्रकार महिलांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. हिरव्या बांगड्यामध्ये सोनेरी जाडसर असा हा पारंपारिक गोठ शोभून दिसतात.
तन्मणी : साधारण मंगळसूत्रासारखा दिसतो. काट पदराच्या साड्यांवर मोत्यांचे दागिने अगदी खुलून दिसतात. पारंपारिक पद्धतीचा हा तन्मणी गुढीपाडव्यासाठी तुम्ही परिधान करु शकता.
मेखला : मेखला हा कंबरपट्टासारखाच असतो. नाजूकशी साखळी त्यावर नक्षीदार काम. मेखला हा सोन्याचा दागिना असून मराठमोळ्या दागिन्याचा एक प्रकार आहे.