Tourists Spots In Hisar: हिसारमध्ये अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहेत, जिथे तुम्ही तुमच्या कुटूंबासोबत आणि मित्रांसोबत भेट देऊ शकता. अशाच काही प्रसिद्ध पर्यटन स्थळांबाबत आता आपण जाणून घेऊया.
Jyoti Malhotra: प्रचंड चर्चेत असलेल्या हिसारमध्ये हे आहेत प्रसिद्ध टूरिस्ट स्पॉट्स, एका दिवसात फिरू शकता संपूर्ण शहर
पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोराखाली अटक करण्यात आलेली ज्योती मल्होत्रा सध्या प्रचंड चर्चेत आहे. ज्योती मल्होत्रा ही हरियाणामधील हिसारा भागातील रहिवासी आहे. हिसारामध्ये अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहेत. इथे गेल्यावर तुमचं मन नक्कीच प्रफुल्लित होईल. विशेष म्हणजे येथे असलेली सर्व ठिकाणे एकाच दिवसात भेट देता येतात. त्यामुळे जर तुम्हाला लाँगविकेंडसाठी सुट्टी मिळत नसेल तर तुम्ही हिसारला जाऊ शकता आणि इथे एकाच दिवसांत अनेक पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता. Jyoti Malhotra: हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली ज्योती मल्होत्रा YouTube वरून किती कमाई करायची? वाचून बसेल धक्का अग्रोहा धाम : हरियाणाच्या हिसारमध्ये असलेलं अग्रोहा धाम हिंदू धर्मातील लोकांचे धार्मिकस्थळ आहे. हे मंदिर देवी लक्ष्मी आणि महाराजा अग्रसैन यांना समर्पित आहे. या मंदिराची निर्मिती वर्ष 1976 सुरु झाली होती आणि वर्ष 1984 मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले होते. (फोटो सौजन्य – Pinterest) फिरोज शाह पॅलेस: हिसारला पूर्वी हिसार-ए-फिरोजा नावाने ओखळलं जात होतं. हिसारमध्ये स्थित फिरोज शाह पॅलेस फिरोज शाह तुगलक द्वारा ई.स. 1354 मध्ये तयार करण्यात आला होता. या महालामध्ये मस्जिद, भूमिगत रुम, सुरंग, दिवाण-ए-आम सारख्या स्थळ पाहायला मिळणार आहेत. गुजरी-महाल: हिसारमध्ये स्थित गुजरी-महल ई.स. 1354 मध्ये फिरोजशाह तुगलकने बांधला होता. हा महाल फिरोज शाह पॅलेसचाच एक भाग आहे. या महाल तयार करण्यासाठी 11 वर्षांचा कालावधी लागला होता. हा महाल बांधण्यासाठी काळ्या दगडांचा वापर करण्यात आला होता. जहाज कोठी: जहाज कोठी म्यूजियम पूर्वी एक जैन मंदिर होतं. जे नंतर जॉर्ज थॉमस यांनी त्यांचे निवासस्थान म्हणून बांधले. ही हवेली जहाजाच्या आकाराची असल्याने, तिला जहाज कोठी असेही म्हणतात. ओपी जिंदल ज्ञान केंद्र: 90 मीटर उंच असलेला हा टॉवर हिसारच्या सर्वात उंच जागांपैकी एक आहे. पर्यटकांना संपूर्ण शहर उंचावरून पाहता यावं, यासाठी हा टॉवर तयार करण्यात आला आहे. टॉवरच्या चारही बाजूंना सुंदर पार्क आणि हिरवळ परसलेली आहे. ओपी जिंदाल जी यांनी वापरलेल्या वस्तूंचे संग्रहालय आणि येथे एक ओपन थिएटर देखील आहे. ट्रॅवल व्लॉगर ज्योती मल्होत्रा करत होती या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर, पोलीस तपासात समोर आलं सत्य ब्लू बर्ड लेक: राष्ट्रीय महामार्ग 10 वर विमानतळाजवळ असलेले हे तलाव हिसार शहरातील एकमेव पर्यटन तलाव आहे. इथे पर्यंटकांसाठी बोटिंगची सुविधा देखील आहे. इथे तुम्हाला वेगगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहायला मिळणार आहेत. यासोबतच इथे हरियाणा सरकारद्वारे चालवले जाणारे ब्लू बर्ड टुरिस्ट रिसॉर्ट देखील आहे. डियर पार्क: हे डियर पार्क हिसारच्या धांसु रस्त्यालगत आहे. हे पार्क 1970 - 71 मध्ये वन विभाग, हरियाणा सरकारद्वारे बांधण्यातच आलं होतं. देवी भवन: देवी भवन शहरातील ऐतिहासिक आणि लोकप्रिय मंदिर आहे. या भेचट देण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात.