नियमित दागिने घातल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे
हिंदू धर्मात सण उत्सवांना विशेष महत्व आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये घरातील सर्वच व्यक्ती छान नटून थटून तयार होतात. महिला सुंदर साडी, दागिने घालून तयार होतात. इतर वस्तूंसोबतच दागिने घातल्यामुळे महिलांच्या सौदंर्यात आणखीन वाढ होते. महिला खास साज शृंगार करून छान तयार होतात. साडी नेसल्यानंतर विवाहित महिला गळ्यात मंगळसूत्र, बांगड्या, नथ, पैंजण इत्यादी पारंपरिक दागिने घालून छान तयार होतात. मागील अनेक शतकांपासून महिला सण उत्सवातच नाहीतर इतर वेळी सुद्धा छान दागिने घालून तयार होत होत्या. मात्र हे दागिने सौदंर्य वाढवण्यासाठीच नाहीतर आरोग्यासाठी सुद्धा गुणकारी आहेत. दागिने घातल्यानंतर महिला सुंदर दिसतात, मात्र त्यांच्या आरोग्याला सुद्धा तितकेच फायदे होतात. चला तर जाणून घेऊया नियमित दागिने घातल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे.(फोटो सौजन्य-pintrest)

नियमित दागिने घातल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे
पूर्वीच्या काळातील महिला दैनंदिन वापरामध्ये नाकात नथ घालत होत्या. नथ हा दागिना सोळा श्रृगांरापैकी एक महत्वाचा दागिना आहे. लग्नाआधी मुलींचे नाक टोचण्याची परंपरा आहे. नाक टोचल्यानंतर सगळ्यात आधी नाकामध्ये सोन्याची किंवा चांदीची तार घातली ज्याची आणि त्यानंतर महिला किंवा मुली नाकात नथ घालायच्या. नाकामध्ये नथ घालत्यामुळे मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळण्यास मदत होते. तसेच श्वसनासंबंधित समस्या कमी होऊन शरीरातील उष्णता कमी होते.

नियमित दागिने घातल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे
लग्न झाल्यानंतर हातामध्ये हिरव्या बांगड्या घातल्या जातात. हिंदू संस्कृतीमध्ये हिरव्या बांगड्या घालणं अत्यंत शुभ मानलं जात. हिरव्या बांगड्या घातल्यामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते. हातामध्ये घातलेल्या काचेच्या हिरव्या बांगड्यांमुळे शरीरातील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. तसेच बांगड्यांच्या आवाजामुळे शरीरावर प्रभाव पडतो आणि भावांना नियंत्रणात राहतात.

नियमित दागिने घातल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे
पायात पैंजण घातल्यामुळे पायांचे सौंदर्य वाढते. अनेक महिला पायात सोनं किंवा चांदीचे पैंजण घालतात. पण पायात शक्यतो चांदीचे पैंजण घालावे. पायात घातलेल्या पैंजणांमुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा वाढते. तसेच चांदीचे पैंजण पायांना ऊर्जा आणि प्रेरणा देतात. सतत पाय दुखणे, पायांमध्ये मुंग्या येणे इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी पायात पैंजण घालावे.






