चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो मिळवण्यासाठी घरगुती उपाय
सणासुदीच्या दिवसांमध्ये किंवा इतर वेळी सर्वच महिलांना सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. यासाठी महिला पार्लरमध्ये जाऊन महागडे फेशिअल किंवा क्लीनअप करून घेतात. पण या सगळ्याचा फारसा प्रभाव त्वचेवर दिसून येत नाही. फेशिअल केल्यानंतर काही दिवस त्वचा चमकदार आणि सुंदर दिसते. पण कालातंराने त्वचेवरील ग्लो कमी होण्यास सुरुवात होते. त्वचेवर कमी झालेला ग्लो पुन्हा वाढवण्यासाठी महिला बाजारात मिळणाऱ्या क्रीम्स किंवा केमिकल ट्रीटमेंट घेतात. हे सर्व त्वचेच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील हरवलेला ग्लो पुन्हा मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय नक्की करून पहा.(फोटो सौजन्य-istock)
चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो मिळवण्यासाठी घरगुती उपाय
काळवंडलेल्या चेहऱ्यावर पुन्हा ग्लो मिळवण्यासाठी एका वाटीमध्ये बेसन घेऊन त्यात चिमूटभर हळद आणि कच्चे दूध घालून मिक्स करून घ्या. या मिश्रणात जास्त दूध घालू नये. जाडसर तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावून घ्या. 15 ते 20 मिनिटं ठेवल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येऊन त्वचा सुंदर दिसेल. बेसन आणि हळदीमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. तयार केलेला फेसपॅक तुम्ही मानेला सुद्धा लावू शकता.
हे देखील वाचा: चेहऱ्यावरील व्हाईटहेड्स आणि ब्लॅकहेड्स घालवायचे आहेत? मग महागडे स्क्रब सोडा आणि हे घरगुती उपाय करून पहा
चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो मिळवण्यासाठी घरगुती उपाय
कॉफीमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते. उन्हामुळे किंवा इतर काही कारणांमुळे काळा पडलेला चेहरा पुन्हा गोरा होतो. फेसपॅक बनवण्यासाठी एका वाटीमध्ये कॉफी पावडर घेऊन त्यात 2 थेंब मध आणिलिंबाचा रस घालून मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण मान आणि संपूर्ण चेहऱ्याला लावून घ्या. त्यानंतर हलक्या हाताने संपूर्ण चेहऱ्यावर मसाज करा. 10 मिनिटं ठेवून चेहरा कोरडा झाल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
हे देखील वाचा: महागडे स्क्रबिंग करण्याऐवजी आता १० रुपयांमध्ये ‘या’ पिठाचा वापर करून बनवा फेस स्क्रब
चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो मिळवण्यासाठी घरगुती उपाय
दह्यामध्ये असलेले गुणधर्म त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवतात. दही थंड असल्यामुळे त्वचेमधील उष्णता कमी होऊन चेहऱ्यावर पिंपल्स येत नाहीत. दह्यापासून फेसपॅक बनवण्यासाठी एका वाटीमध्ये दही घेऊन त्यात 1 चमचे टोमॅटो पेस्ट टाकून मिक्स करा. त्यानंतर तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहरा लावून कोरडा होण्यासाठी तसाच ठेवा. 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचेवरील डाग निघून जातील आणि पिंपल्स येणार नाहीत.