आपला चेहरा चांगला दिसावा असे प्रत्येकाला वाटत असते. आपला चेहरा आपली ओळख असतो त्यामुळे याची वेळोवेळी काळजी घेणे फार गरजचे आहे. बदलत्या वातावरणानुसार आपल्या चेहऱ्यावर अनेक बदल होऊ लागतात. चेहऱ्याची योग्य रीतीने काळजी न राखल्यास चेहरा खराब होण्याची शक्यता असते. चेहऱ्याच्या समस्यांविषयी बोलणे केले तर अनेक लोकांना यातील दोन समस्यांना मुख्यत्वे तोंड द्यावे लागते. यातील एक म्हणजे व्हाईटहेड्स आणि दुसरे म्हणजे ब्लॅकहेड्स. हे दोन्ही मुरुमांचे प्रकार असून अनेक लोक या समस्यांनी ग्रासलेले आहेत.
अनेकदा आपण चेहऱ्याच्या समस्या दूर करण्यासाठी महागड्या प्रोडक्टसचा वापर करू पाहतो मात्र प्रत्येक वेळी हे प्रोडक्टस फायदेशीर ठरत नाहीत. तसेच बाजारातील केमिकलयुक्त प्रोडक्टसमुळे आपला चेहरा आणखीन खराब होण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला व्हाईटहेड्स-ब्लॅकहेड्समधील फरक आणि यावर करता येणारे घरगुती उपचार याविषयी सविस्तर माहिती सांगत आहोत.
हेदेखील वाचा – श्रद्धा कपूर आहे ‘या’ मराठमोळा पदार्थाच्या प्रेमात, बॉलिवूड अभिनेत्रीची रांगडी आवड थक्क करणारी
व्हाईटहेड्स हे पांढरे, लहान किंवा त्वचेच्या रंगाप्रमाणे दिसतात. हे त्वचेच्या मृत पेशी, तेल, बॅक्टेरिया त्वेचेवरील केसांच्या कूपमध्ये अडकतात तेव्हा तयार होतात. व्हाईटहेड्स हे मुख्यतः पांढरे किंवा किंचित पिवळ्या रंगाचे असतात. हे चेहऱ्यावर विशेषतः नाक, हनुवटी आणि कपाळावर दिसून येतात.
चेहऱ्याच्या त्वचेवर घाम जमा होऊ लागली की चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स दिसू लागतात. ब्लॅकहेड्स एक प्रकारे काळ्या रंगाचे ठिपके असतात जे नाक, हनुवटी आणि कपाळावर पाहायला मिळतात.
मध
मधामध्ये नैसर्गिक बॅक्टेरिया प्रतिबंध करणारे आणि दाहक विरोधी गुणधर्म असतात, जे त्वचेला फ्रेश ठेवण्यास मदत करतात. तुमच्या चेहऱ्यावरील व्हाईटहेड्स आणि ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी तुम्ही मधाचा वापर करू शकता. यासाठी मध घ्या आणि थेट व्हाईटहेड्स आणि ब्लॅकहेड्स असणाऱ्या जागी लावा. यानंतर हा मध 15-20 मिनिटे चेहऱ्यावर तसाच राहू द्या. नंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवून टाका. दररोज हा उपाय केल्याने निश्चितच चेहऱ्यावरील व्हाईटहेड्स आणि ब्लॅकहेड्स कमी होण्यास मदत मिळेल.
हेदेखील वाचा –सुरमा आणि काजळमध्ये काय फरक असतो? जाणून घ्या
लिंबाचा रस
लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ॲसिड असते, जे त्वचेला एक्सफोलिएट करण्यास आणि चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी करण्यास मदत करत असते. चेहऱ्यावरील व्हाईटहेड्स आणि ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी लिंबाचा पर्याय फायदेशीर ठरू शकतो. तर कापसाच्या मदतीने तुम्ही चेहऱ्यावर लिंबाचा रस लावून 10 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि मग पाण्याने चेहरा धुवून काढा.
एलोवेरा
एलोवेरामध्ये अनेक गुणधर्म असतात जे त्वचेचे उपचार करण्यास फायदेशीर ठरत असतात. हे चेहऱ्यावरील खाज, जळजळ दूर करून त्वचेला थंडावा देण्यास मदत करत असतात. तर व्हाईटहेड्स आणि ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी एलोवेरा जेल लावून 15-20 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा आणि मग चेहरा पाण्याने स्वछ धुवा.