ऋषीमुनींच्या मते शिक्षक आणि वडीलधाऱ्यांच्या पायांना स्पर्श केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो. यासोबतच व्यक्तीला शक्ती, बुद्धिमत्ता, शिक्षण, सुख-समृद्धी प्राप्त होते.सनातन धर्मात आपल्या वयाच्या व्यक्तीला हात जोडून नमस्कार करण्याची परंपरा आहे.
आपल्यालाही लहानपणी आईवडिलांनी शिकवले आहे, घरात पाहुणे आले की त्यांना वाकून नमस्कार करायचा आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचा. अनेकदा ते पाहुणेही आपल्या घरातल्या मोठ्या माणसांच्या स्वत:हून पाया पडून आशीर्वाद घेतात.
आजही काही ठिकाणी लोक एकमेकांना हात जोडून नमस्कार करतात.तज्ज्ञांच्या मते, मोठ्यांच्या पायांना स्पर्श केल्याने त्यांच्या पायावर डोकं ठेवल्याने त्यांचा आशीर्वाद तर मिळतोच, पण पाठदुखीपासून देखील आराम मिळतो.व्यक्तीला शक्ती, बुद्धिमत्ता, शिक्षण, सुख-समृद्धी प्राप्त होते.सध्याच्या काळात असे म्हटले जाते की पायाला स्पर्श केल्याने व्यक्तीचे आयुष्य वाढते आणि भाग्य लाभते.
जर तुम्ही खूप दिवसांपासून कंबर आणि पाठदुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर रोज सकाळी आई-वडिलांच्या पायांना स्पर्श करून पूजा करा. असे म्हणतात की साष्टांग नमस्कार केल्याने कंबर आणि पाठदुखीमध्ये खूप लवकर आराम मिळतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वृद्धांच्या पायाला स्पर्श केल्याने कमरेच्या वरच्या भागात रक्ताभिसरण व्यवस्थित होते. त्यामुळे त्वचा आणि केसांची समस्या दूर होण्यास मदत होते.