फोटो सौजन्य: iStock
आपल्यापैकी अनेक जण असे असतात, ज्यांनी कितीही ठरवलं की सकाळी लवकर उठणार तरीसुद्धा ते उशिराच उठतात. याबाबत नेहमीच त्यांना घरातील मोठ्या व्यक्तींचे बोलणे देखील ऐकावे लागते. काही जण तर सकाळचा अलार्म सेट करतात मात्र तो स्वतःच बंद सुद्धा करतात. खरंतर, झोप मोडणे म्हणजे एखादे गोड स्वप्न मोडण्यासारखे आहे. यात रात्री उशिरा जागून उशिरा उठण्याची सवय ही आता आजच्या धावपळीच्या जीवनाचा एक भाग बनली आहे.
डॉक्टरांच्या मते, सकाळी उठताच, चेहऱ्यावर थंड पाणी शिंपडा किंवा चेहरा धुवा. यामुळे शरीराला थोडा धक्का बसतोच, शिवाय मेंदूही जलद सक्रिय होतो. थंड पाणी त्वचेला स्पर्श करताच, शरीराच्या नसा जागे होतात आणि मेंदूमध्ये सतर्कता वाढते. यामुळे डोळ्यांतील आळस दूर होतो आणि शरीर सक्रिय वाटते. चला काही अशा सोप्या सवयींबद्दल जाणून घेऊयात, ज्यामुळे तुमची झोप लगेच उडेल.
Belly Button Piercing सुरक्षित आहे की नाही, वाढतोय ट्रेंड; नाभीत रिंग टोचून घेताना काय घ्याल काळजी
झोपण्याच्या किमान एक तास आधी मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्हीपासून दूर राहा. स्क्रीनवरून पडणारी ब्ल्यू लाइट ‘मेलॅटोनिन’ या झोपेसाठी महत्त्वाच्या हार्मोनवर परिणाम करतो, ज्यामुळे सकाळी थकवा आणि सुस्ती जाणवू शकते.
रोज ठराविक वेळी झोपणे आणि उठणे तुमच्या शरीरातील नैसर्गिक घड्याळाला स्थिर ठेवते. यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते आणि सकाळी उठणे अधिक सहज होते.
डोळे उघडल्यानंतर लगेच खिडकी उघडा किंवा थोडावेळ उन्हात घालवा. नैसर्गिक प्रकाश मेंदूला जागे होण्याचा संकेत देतो आणि दिवसभर उत्साही ठेवतो.
अलार्म किंवा मोबाईल बेडपासून थोड्या अंतरावर ठेवा, जेणेकरून तो बंद करण्यासाठी उठावे लागेल. ही कृती तुम्हाला झोपेच्या स्थितीतून बाहेर आणण्यास मदत करते.
झोपेतून उठताच बेडवरच थोडं स्ट्रेचिंग किंवा योगाभ्यास करा. यामुळे शरीरात ब्लड सर्क्युलेशन वाढते आणि झोप पूर्णपणे दूर होते.
सकाळी उठणे ही एक आरोग्यदायी जीवनशैली आहे. जर तुम्हाला दिवस भरपूर उर्जेसह सुरू करायचा असेल, तर उठल्यावर सर्वप्रथम चेहरा धुण्याची सवय लावा. हा छोटासा बदल ताजेतवाने जाणवायला लावतो आणि तुमचा दिवस सकारात्मकतेने सुरू होतो.