सध्याच्या फॅशन युगात कपडे आणि दागिन्यांमध्ये अनेक नवनवीन बदल होताना दिसून येत आहेत. बाजारात वेगवेगळ्या फॅब्रिक आणि डिझाईनमध्ये अनेक साड्या उपलब्ध झाल्या आहेत. साडी खरेदी केल्यानंतर त्यावर नेमका कशा पद्धतीने ब्लाऊज शिवून घ्यावा, यामध्ये खूप जास्त गोधंळ निर्माण होतो. सिंपल साडी घेतल्यानंतर त्यावर ब्लाऊज शिवून घेण्याऐवजी मल्टीकलर ब्लाऊज परिधान करावा. मल्टीकलर ब्लाऊज कोणत्याही साडीवर किंवा लेहेंग्यावर अतिशय सुंदर दिसतो. इतरांपेक्षा हटके आणि युनिक लुक हवा असेल तर तुम्ही या डिझाईनचे मल्टीकलर ब्लाऊज परिधान करू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
साडीवरील लुक आणखीनच सुंदर करण्यासाठी परिधान करा मल्टीकलर ब्लाऊज

महिलांमध्ये मल्टीकलर ब्लाऊज डिझाइन्सची प्रचंड क्रेझ वाढली आहे. यामध्ये विविध रंगाचे योग्य कॉम्बिनेशन, डिझाइन आणि कट, आरी वर्क करून सुंदर ब्लाऊज शिवाला जातो.

कोणत्याही कॉटन किंवा डिझायनर साडीवर तुम्ही मल्टिकलर ब्लाऊज घालू शकता. अनेकांना स्ट्रॅप असलेले ब्लाऊज घालायला खूप जास्त आवडतात. त्यांच्यासाठी हा पर्याय उत्तम आहे.

कोणत्याही सॉलिड रंगाच्या साडीवर तुम्ही या डिझाईनचे आणि रंगांचे ब्लाऊज घालू शकता. फ्लोरल, जिओमेट्रिक, अज्राख किंवा कलमकारी प्रिंट्स असलेले ब्लाऊज कोणत्याही साडीवर घालू शकता.

बऱ्याचदा लेहेंगा खरेदी केल्यानंतर त्यावर कशा पद्धतीने ब्लाऊज शिवून घ्यावा सुचत नाही. अशावेळी तुम्ही या डिझाईनचा ब्लाऊज खरेदी करू शकता. तसेच प्रिंटेट ब्लाऊज ऑफिस किंवा कॅज्युअल फंक्शनसाठी सुद्धा वापरता येतात.

पांढऱ्या रंगाच्या ब्लाऊज वेगवेगळ्या रंगची फुले किंवा सुंदर नक्षीकाम करून डिझाईन केल्यास तुमचा लुक स्टायलिश दिसेल. पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज प्रत्येक महिलेच्या कपाटात असायलाच हवा.






