नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. यादिवशी घरात सुगड पूजन करून हळदीकुंक केले जाते. तसेच महिला काळ्या रंगाची साडी नेसतात. मकरसंक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगला खूप जास्त महत्व आहे. मकरसंक्रांतीच्या सणाला 'हलव्याचे दागिने' घातल्यास गोडवा वाढतो, असे मानले जाते. ही महाराष्ट्रातील अतिशय जुनी परंपरा आहे. हलव्याच्या दागिन्यांमुळे आनंद, समृद्धी आणि गोडवा वाढतो. हलव्याचे दागिने केवळ सुंदर दिसण्यासाठी नाहीतर परंपरा जपण्यासाठी परिधान केले जातात. हे दागिने तीळ, साखर आणि साबुदाणा वापरून बनवले जातात. हार, कानातले, कमरेचा पट्टा, बांगड्या, हे नवीन आयुष्याच्या गोड सुरुवातीचे प्रतीक आहे.चला तर पाहुयात हलव्याच्या दागिन्यांच्या काही सुंदर डिझाईनस. (फोटो सौजन्य – pinterest)
हलव्याच्या दागिन्यांनी वाढवा मकरसंक्रांती सणाचा गोडवा!

पारंपरिक दागिन्यांमध्ये नथ आवर्जून परिधान केली जाते. नथ घातल्याशिवाय लुक पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. त्यामुळे हलव्याच्या दागिन्यांमध्ये तुम्ही आकाराने लहान पण आकर्षक नथ बनवून घेऊ शकता. तिळगुळापासून तयार केलेली नथ नाकात शोभून दिसेल.

सोन्याच्या मंगळसूत्राप्रमाणे हलव्याच्या मंगळसूत्राला सुद्धा विशेष महत्व आहे. अनेकांना खूप जास्त दागिने घालायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही हलव्याचे सुंदर मंगळसूत्र परिधान करू शकता.

काळ्या रंगाच्या साडीवर पांढऱ्या रंगाच्या हलव्याच्या बांगड्या शोभून दिसतील. यामुळे सौंदर्यात भर पडेल. काळ्या रंगाच्या साडीवर हिरवा चुडा घालण्याऐवजी हलव्याच्या बांगड्या घालाव्यात.

बाजारात हलव्याचे दागिने तुमच्या आवडीनुसार सुद्धा बनवून मिळतात. त्यामध्ये तुम्ही कंबरपट्टा, बाजूबंद इत्यादी दागिने बनवून घेऊ शकता. यामुळे तुमचे हात भरगच्च दिसतील.

चिंचपेटी दागिना गळ्यात कायमच घातला जातो. त्यामुळे हलव्याच्या दागिन्यांची भरगच्च चिंचपेटी किंवा तन्मणी तुम्ही काळ्या रंगाच्या साडीवर घालू शकता.






