साहित्य :
कृती :
एका भांडया मध्ये दुध आणि साखर मिक्स करून साखर विरघळे पर्यंत गरम करून घ्या. नंतर त्या मिश्रणात तूप घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या तसेच काही काळ थंड होऊ द्या. एका ताटात मैदा घेऊन त्यात मीठ घालुन मिक्स करा. तसेच त्या मळलेल्या पिठलं थोडेसे तुपाचे मोहनही लावा. त्यानंतर त्यात दुधाचे मिश्रण घालून गोळा घट्ट होईल असा तैयार करून घ्या. हा गोळा १० मिनिटांसाठी झाकून ठेवा.
मळलेल्या पिठाच्या गोळ्या मधून लहान मध्यम आकारचे गोळे घेऊन १ इंच इतकी जाडसर पोळी लाटून घ्यावी. पोळी लाटून झाल्यानंतर त्यावर चाकू ने शंकरपाळ्या पाडून घ्याव्यात.
शंकरपाळ्या कापताना अगदी हळुवारपणे एकसारखे काप कापावे आणि सुती कपडयावर सुकण्यास ठेवावे. हे काप एकावर एक ठेवू नयेत अन्यथा एकमेकांना चिटकतात. तेला मध्ये किवां तूपा मध्ये शंकरपाळ्याला मध्य आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्याव्यात. अशा प्रकारे स्वादिष्ट आणि खुसखुशीत शंकरपाळ्या तयार होतात.
टीप :