Matar Karanji Recipe : मसालेदार आणि कुरकुरीत चवीची मटर करंजी हलक्या फुलक्या स्नॅक्ससाठी एक टेस्टी पर्याय ठरते. तुम्ही घरच्या घरी झटपट ही डिश तयार करु शकता.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
तुम्ही कधी मटर करंजी खाल्ली आहे का?
हा एक स्नॅक्सचा प्रकार आहे जो चवीला फार टेस्टी लागतो.
घरी तयार केलेली ही मटर करंजी घरातील सर्वांनाच नक्की आवडेल.
मटर करंजी ही पारंपरिक करंजीचा एक वेगळा आणि चविष्ट प्रकार आहे. साधारणपणे करंजी म्हटलं की गोड सारणाची आठवण येते, पण बदलत्या चवींच्या आवडीनुसार खमंग आणि तिखट प्रकारही तितकेच लोकप्रिय होत आहेत. मटर करंजी ही त्याचाच एक उत्तम नमुना आहे. हिरव्या मटाराचा गोडसरपणा, त्यात घातलेले मसाले आणि कुरकुरीत आवरण यामुळे ही करंजी चहाच्या वेळेस किंवा हलक्या खाण्यासाठी अगदी योग्य ठरते. विशेष म्हणजे हिवाळ्यात ताज्या मटारांचा वापर करून बनवलेली ही करंजी अधिकच स्वादिष्ट लागते. संध्याकाळच्या हलक्या भूकेसाठी जर तुम्ही काही चटपटीत पदार्थ शोधत असाल तर आजची ही रेसिपीतुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरु शकते. चला याची रेसिपी नोट करुन घेऊयात.