उन्हामुळे वैताग आला आहे? झटपट काळ्या द्राक्षांपासून बनवा Grapes Lemonade, क्षणभरात वाटेल फ्रेश आणि ताजेतवाने
वाढत्या उन्हामुळे अंगाची काहिली होते आणि खूप जास्त वैताग येतो. या दिवसांमध्ये जास्त कुठे बाहेर जाण्याची अजिबात इच्छा होत नाही. कारण वाढत्या गर्मीमुळे शरीरात खूप जास्त थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. अशावेळी शरीर हायड्रेट आणि फ्रेश वाटण्यासाठी वेगवेगळे कोल्ड्रिंक किंवा मॉकटेल विकत आणून प्यायली जातात. पण नेहमीच कोल्ड्रिंक किंवा सोडा पिणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. यामुळे पोटासंबंधित गंभीर समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काळ्या द्राक्षांपासून ग्रेप्स लेमोनेड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले ग्रेप्स लेमोनेड चवीला अतिशय सुंदर लागते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष उपलब्ध असतात. काळ्या द्राक्षांचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, रेझव्हेराट्रॉल नावाचे संयुग आढळून येते. काळी द्राक्ष खाल्ल्यामुळे शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. शरीराला आलेली सूज कमी करण्यासाठी काळी द्राक्ष खावीत. चला तर जाणून घेऊया ग्रेप्स लेमोनेड बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






