उन्हाळा स्पेशल पारंपरिक पदार्थ! वाटीभर बेसनपासून झटपट बनवा झणझणीत कैरीचं पिठलं, नोट करून घ्या रेसिपी
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर कच्च्या कैऱ्या, पिकलेले आंबे आणि इतर रानमेवा उपलब्ध होतो. आंबटगोड चवीची कैरी खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. कैरीचे पन्ह, मुरंबा, लोणचं, मेथांबा इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. आंबटगोड चवीचे पदार्थ जेवणाच्या ताटात असल्यास चार घास जास्त जातात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कैरीपासून विविध पदार्थ बनवावेत. आज आम्ही तुम्हाला कैरीचे पिठलं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कैरीचे पिठलं गरमागरम भाकरी किंवा भातासोबत अतिशय चविष्ट आणि सुंदर लागते. भाजी बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर नेहमीच काय बनवावं सुचत नाही. अशावेळी तुम्ही झटपट वाटीभर बेसनाचा वापर करून झणझणीत पिठलं बनवू शकता. तोंडाची चव वाढवण्यासाठी विविध पदार्थ खाल्लेले जातात. पण तिखट किंवा तेलकट पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया कैरीचं पिठलं बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






