Strait of Hormuz toll : टोल बूथ विसरा, इराणने होर्मुझसाठी तयार केला आहे नवीन १२-कलमी नियमांचा मसुदा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Iran 12-point resolution Hormuz 2026 : जागतिक व्यापाराचा श्वास रोखून धरण्याची ताकद असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवर (Strait of Hormuz) आता इराणचा अधिकृत ‘टोल नाका’ सुरू होणार आहे. इराणच्या संसदेने एक असा १२-कलमी ऐतिहासिक आणि वादग्रस्त मसुदा तयार केला आहे, जो जागतिक सागरी सुरक्षेची समीकरणे पूर्णपणे बदलून टाकेल. या नव्या नियमांमुळे इस्रायल आणि त्याच्या मित्र राष्ट्रांसमोर मोठे संकट उभे राहिले असून, इराणने आता समुद्रातही आपली लष्करी आणि कायदेशीर ताकद आजमावण्यास सुरुवात केली आहे.
इराणच्या या नव्या मसुद्यानुसार, इस्रायल आणि ग्रीस, संयुक्त अरब अमिरात (UAE) तसेच सोमालीलँड यांसारख्या इस्रायल समर्थक देशांच्या जहाजांना आता होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणे कठीण होणार आहे. अमेरिकेला मदत करणाऱ्या देशांनाही या मार्गावरून जाण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. जर या देशांना आपली जहाजे चालवायची असतील, तर त्यांना इराणच्या ‘सर्वोच्च परिषदेची’ विशेष परवानगी घ्यावी लागेल. थोडक्यात, इराणने या महत्त्वाच्या सागरी मार्गावर आपली ‘कायदेशीर नाकेबंदी’ जाहीर केली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Meloni Insult : ‘तू मूर्ख आणि नीच स्त्री!’ रशियाच्या सरकारी टीव्हीवर जॉर्जिया मेलोनींचा भीषण अपमान; Russia-Italyमध्ये वाजलं
या प्रस्तावातील सर्वात धक्कादायक आणि जाचक अट म्हणजे ‘माल जप्ती’. जर एखाद्या जहाजाने इराणने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केले, तर ते जहाज तात्काळ जप्त करून इराणच्या बंदरात नेले जाईल. तिथे त्या जहाजावरील एकूण मालापैकी २० टक्के माल जप्त केला जाईल. ही जप्ती सीमा शुल्क (Customs) म्हणून दाखवली जाईल आणि त्यानंतरच त्या जहाजाला पुढे जाण्याची परवानगी मिळेल. इराणच्या या पावलामुळे आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपन्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
🚨⚡️NOW The Islamic Revolutionary Guard Corps opened fire on ships in the Strait of Hormuz that attempted to “break the blockade”! 🇮🇷🔥 Iranian media: Direct gunfire targeting the Swiss vessel MSC Francesca and two other ships (Greek and Emirati) after they turned off their… pic.twitter.com/BB69vqq74X — RussiaNews 🇷🇺 (@mog_russEN) April 22, 2026
credit – social media and Twitter
इराणचे खासदार मोहम्मद रझा रझायी कूची यांच्या मते, यापुढे होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांना इराणच्या चलनात म्हणजे ‘इराणी रियाल’मध्ये टोल भरावा लागेल. या टोलची रक्कम जहाजाचा आकार आणि त्यातील मालानुसार ठरवली जाईल. विशेष म्हणजे, शत्रू राष्ट्रांची व्याख्या विचारली असता कूची यांनी एक विचित्र विधान केले. ते म्हणाले, “जे देश ‘पर्शियन गल्फ’ (Persian Gulf) या नावाचे स्पेलिंग बरोबर लिहीत नाहीत, ते आमचे शत्रू आहेत.” इराणने या माध्यमातून आपल्या अस्मितेचा मुद्दा जागतिक व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iceman Promo : ड्रेकचा ‘कूल’ स्टंट! भर उन्हात शहरात अवतरला हिमनग; बर्फ वितळताच आत मोठं सरप्राइज, पाहा VIDEO
या वादळात भारतासाठी एक दिलासादायक बातमी आहे. इराणने आपल्या ‘मित्र’ देशांच्या यादीत भारत आणि चीनचा समावेश केला असून, त्यांच्या जहाजांकडून कोणताही टोल घेतला जाणार नाही. दुसरीकडे, ओमानच्या सीमेजवळून जाणाऱ्या जहाजांनाही सवलत आहे, पण तिथला समुद्र अत्यंत उथळ असल्याने मोठी जहाजे तिथून नेणे अशक्य आहे. त्यामुळे जगाला पर्याय नसून इराणच्या अटींनुसारच वागावे लागेल, अशी ही एकूण परिस्थिती आहे.
Ans: हा इराणच्या संसदेने तयार केलेला ठराव असून, याद्वारे होर्मुझच्या सामुद्रधुनीवर कायदेशीर नियंत्रण मिळवून शत्रू राष्ट्रांच्या जहाजांकडून टोल वसूल करणे आणि त्यांच्यावर बंदी घालणे हा मुख्य उद्देश आहे.
Ans: नियमांचा भंग करणाऱ्या जहाजाला जप्त करून त्यातील २० टक्के माल सीमा शुल्क म्हणून इराण उतरवून घेणार आहे.
Ans: नाही, इराणने भारत आणि चीन यांसारख्या मित्र राष्ट्रांना या टोलमधून आणि जाचक अटींमधून सवलत दिली आहे.






