Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक वेळचे जेवण, अनेक आयुष्यांचे परिवर्तन! मलाबार ग्रुपच्या ‘हंगर फ्री वर्ल्ड’चा बदल घडवणारा उपक्रम

Malabar Group Hunger Free World Programe : जागतिक भूक दिनानिमित्त मलाबार ग्रुपच्या ‘हंगर फ्री वर्ल्ड’ उपक्रमाने स्ट्रीट मील डिस्ट्रीब्युशन प्रोग्रामचा प्रभाव “रिहॅबिलिटेशन इम्पॅक्ट रिपोर्ट”मधून अधोरेखित केला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 06, 2026 | 05:18 PM
एक वेळचे जेवण, अनेक आयुष्यांचे परिवर्तन! मलाबार ग्रुपच्या ‘हंगर फ्री वर्ल्ड’चा बदल घडवणारा उपक्रम
Follow Us
Follow Us:
  • एक वेळचे जेवण, अनेक आयुष्यांचे परिवर्तन
  • ‘हंगर फ्री वर्ल्ड’चा बदल घडवणारा उपक्रम
  • 20 राज्ये आणि 9 देशांमध्ये कार्यरत
जागतिक भूक दिनानिमित्त, मलाबार ग्रुपच्या मानवतावादी उपक्रम ‘हंगर फ्री वर्ल्ड’ने आपल्या स्ट्रीट मील डिस्ट्रीब्युशन प्रोग्रामचा प्रभाव “रिहॅबिलिटेशन इम्पॅक्ट रिपोर्ट: इम्पॅक्ट स्टोरीज – एका दैनंदिन जेवणामुळे कसे बदलते आयुष्य” या अहवालाद्वारे अधोरेखित केला. या अहवालात, थनल संस्थेद्वारे प्रत्यक्ष स्तरावर राबविण्यात येणाऱ्या दैनंदिन अन्न वितरण मोहिमेमुळे रस्त्यावर राहणाऱ्या असुरक्षित व्यक्तींना बचाव, वैद्यकीय मदत, निवाऱ्याची सुविधा, सन्मानाची पुनर्स्थापना आणि कुटुंबीयांशी पुनर्मिलन कसे शक्य झाले, हे नोंदविण्यात आले आहे.

मुंबईत रंगणार ‘साडी मेला 2026′; सुंदरी सिल्क्स इंडियाकडून पारंपरिक विणकामाचा भव्य उत्सव

स्ट्रीट मील डिस्ट्रीब्युशन प्रोग्रामची सुरुवात पौष्टिक अन्नाची नियमित उपलब्धता करून भुकेच्या समस्येला उत्तर देण्यासाठी करण्यात आली होती. कालांतराने हा उपक्रम अधिक सखोल काळजी आणि सहाय्याचा दुवा बनला आहे. दैनंदिन संपर्कामुळे क्षेत्रीय कार्यकर्त्यांना लाभार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण करता येतो, त्यांच्या आरोग्य आणि वर्तनातील बदल ओळखता येतात, अडचणींची जाणीव होते आणि त्यांना पुनर्वसन सेवांशी जोडता येते. या अहवालात कार्यक्रमाच्या मुख्य विश्वासाला अधिक बळ देण्यात आले आहे की, सातत्याने आणि मानवी संवेदनशीलतेने दिलेले एक जेवण मोठ्या परिवर्तनाची सुरुवात ठरू शकते. हा कार्यक्रम सध्या भारतातील 20 राज्यांमध्ये आणि सहा GCC देश, अमेरिका, युनायटेड किंगडम आणि झांबिया यांसह नऊ देशांमध्ये कार्यरत आहे. मायक्रो लर्निंग सेंटर्स आणि स्ट्रीट मील डिस्ट्रीब्युशन प्रोग्राम या दोन प्रमुख उपक्रमांद्वारे 1,43,000 लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात आले आहे.

या उपक्रमाबाबत बोलताना मलाबार ग्रुपचे अध्यक्ष एम. पी. अहमद म्हणाले, “एक जेवण साधे वाटू शकते, परंतु जेव्हा ते सातत्याने आणि मानवी संवेदनशीलतेने दिले जाते, तेव्हा ते फक्त अन्न राहत नाही. हंगर फ्री वर्ल्डच्या माध्यमातून आम्ही पाहिले आहे की नियमित संपर्क कसा विश्वास निर्माण करतो आणि तो विश्वास पुनर्वसन, आरोग्यसेवांपर्यंत पोहोच, भावनिक आधार आणि सन्मान पुनर्स्थापनेचा पाया बनतो. या कथा असुरक्षित समुदायांशी सातत्यपूर्ण संवादाचे महत्त्व अधोरेखित करतात, जिथे करुणा आणि सातत्य एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याची दिशा अर्थपूर्णपणे बदलू शकते.”

स्ट्रीट मील डिस्ट्रीब्युशन प्रोग्रामअंतर्गत अनेक उदाहरणांनी दाखवून दिले आहे की नियमित जेवणामुळे सखोल काळजी आणि सहाय्याचा मार्ग कसा खुला होऊ शकतो. नागरकोइल येथे बसस्थानका जवळ अन्न मिळवणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीने सुरक्षित आयुष्य जगण्याची इच्छा अन्न वितरण वाहन चालका समोर व्यक्त केली आणि त्यानंतर त्याला एका केअर होम मध्ये दाखल करण्यात आले. कुंभकोणम मध्ये, अनेक महिन्यांच्या नियमित अन्न सहाय्यामुळे खाटेवर खिळलेल्या व्यक्तीचा सन्मान स्वच्छता सेवा, स्वच्छ कपडे आणि पुनर्वसन सहाय्याद्वारे पुनर्स्थापित करण्यात आला. चेन्नई मध्ये, दिवसातून दोन वेळा होणाऱ्या सातत्यपूर्ण अन्न वितरण मोहिमेमुळे संकटात जीवन जगणाऱ्या एका महिलेला हळूहळू मदत स्वीकारण्यास आणि नंतर केअर सेंटरमध्ये स्थलांतरित होण्यास मदत झाली.

या कार्यक्रमामुळे उडुपी ते चेन्नई असा भावनिक कौटुंबिक पुनर्मिलनही शक्य झाला. नियमित अन्न वितरणादरम्यान झालेल्या संवादामुळे टीमला एका व्यक्तीची ओळख पटवता आली आणि त्याला त्याच्या पत्नी व मुलांशी पुन्हा जोडता आले. तिरुचिरापल्ली येथे नियमित अन्न वितरण मोहिमेदरम्यान एका शारीरिकदृष्ट्या दिव्यांग ज्येष्ठ नागरिकाची प्रकृती खालावत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांना वैद्यकीय मदत, शस्त्रक्रियेनंतर पोषणविषयक काळजी आणि निवाऱ्याची सुविधा देण्यात आली. या अनुभवांमधून हे स्पष्ट होते की सातत्य आणि करुणेने दिलेले एक जेवण काळजी, सन्मान आणि अधिक सुरक्षित आयुष्याचा दुवा बनू शकते.

हा उपक्रम सामुदायिक कल्याण आणि सर्वसमावेशक विकासासाठी मलाबार ग्रुपच्या व्यापक CSR बांधिलकीचा भाग आहे. हंगर फ्री वर्ल्ड हा बहुआयामी दृष्टिकोन स्वीकारतो, जो तातडीची भूक भागवण्याबरोबरच पोषण, पुनर्वसन, आरोग्य सहाय्य, निवारा, सन्मान पुनर्स्थापना आणि कुटुंबीयांशी पुनर्जोडणीद्वारे असुरक्षित व्यक्तींना आधार देतो.

मलाबार ग्रुप आपल्या निव्वळ व्यापार नफ्यापैकी पाच टक्के हिस्सा सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांसाठी देतो. भूक निर्मूलन, शिक्षण, आरोग्यसेवा, निवास, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरणीय शाश्वतता यांसारख्या क्षेत्रांतील दीर्घकालीन कार्यक्रमांना या माध्यमातून पाठबळ दिले जाते.हंगर फ्री वर्ल्ड आणि स्ट्रीट मील डिस्ट्रीब्युशन प्रोग्रामद्वारे मलाबार ग्रुप आणि थनल सातत्याने हे दाखवून देत आहेत की दैनंदिन जेवण हे काळजी, संरक्षण, पुनर्प्राप्ती आणि मानवी नातेसंबंधांकडे नेणारे पहिले पाऊल ठरू शकते.

Nail Colour Meaning: नखांचा रंग बदलतोय? शरीर देतंय गंभीर आजारांचे संकेत; वेळेत ओळखा ‘ही’ लक्षणं

Web Title: Malabar groups hunger free world highlights impact of street meal program on world hunger day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 05:18 PM

Topics:  

  • food
  • health
  • healthy food

संबंधित बातम्या

Manipal Health IPO: टेमासेक-समर्थित ‘मणिपाल हेल्थ’चा आयपीओ 29 जुलै रोजी उघडणार; इक्विटी शेअरचा किती  किंमतपट्टा निश्चित?
1

Manipal Health IPO: टेमासेक-समर्थित ‘मणिपाल हेल्थ’चा आयपीओ 29 जुलै रोजी उघडणार; इक्विटी शेअरचा किती किंमतपट्टा निश्चित?

Zomato News: हॉटेलपेक्षा ऑनलाईन जेवण महाग का? CCI कडून झोमॅटोला क्लीन चिट; ‘हे’ कारण ठरले महत्त्वाचे!
2

Zomato News: हॉटेलपेक्षा ऑनलाईन जेवण महाग का? CCI कडून झोमॅटोला क्लीन चिट; ‘हे’ कारण ठरले महत्त्वाचे!

Health Workers Protest: आरोग्य कर्मचाऱ्यांचा ‘अन्नत्याग’! वसई-विरार महापालिकेच्या 500 कर्मचाऱ्यांचा वेतन हक्कासाठी लढा
3

Health Workers Protest: आरोग्य कर्मचाऱ्यांचा ‘अन्नत्याग’! वसई-विरार महापालिकेच्या 500 कर्मचाऱ्यांचा वेतन हक्कासाठी लढा

रात्रीचं जेवण ठरतंय आजारांचे कारण? वेळीच बदला ‘या’ सवयी, नाहीतर होईल पश्चाताप
4

रात्रीचं जेवण ठरतंय आजारांचे कारण? वेळीच बदला ‘या’ सवयी, नाहीतर होईल पश्चाताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.