आजच्या धावपळीच्या युगात अनेकजण कामात इतके व्यस्त झाले आहेत की, अनेकांनी आपल्या जीवनशैलीकडे लक्ष देणं बंद केलं आहे, ज्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. या कारणामुळेच आजकाल कमी वयातच लोक डायबिटीज, हृदयविकार, सांधेसुखी सारख्या आजारांनी त्रस्त आहेत. सामान्यतः या सगळ्या समस्या वृद्ध वयात किंवा आनुवांशिकतेमुळे होतात. मात्र चुकीच्या लाइफस्टाइलमध्ये कमी वयातच लोक आजरांनी ग्रासलेले असतात. अनहेल्दी आहार, व्यायामाचा अभाव ही कारणे कारणीभूत ठरू शकतात.
या सर्व कारणांमुळेच आजच्या पिढीने आपल्या आहारात आणि जीवनशैलीत काही बदल करणे गरजेचे आहे. आम्ही सांगतो की, यासाठी तुम्हाला काही विशेष करण्याची गरज नाही, तुम्ही रोजच्या पिठात फक्त काही मसाले मिक्स करून आरोग्याच्या समस्यांपासून आराम मिळवू शकता. याच्या मदतीने अपचन, ब्लोटिंग, गॅस अशा समस्या देखील दूर होतील. हे पदार्थ पिठाला अधिक पौष्टिक बनवण्यास मदत करतात. चला तर मग हे नक्की कोणते पदार्थ आहेत याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – सकाळी उठल्यावर दिसणारी ही लक्षण देत असतात डायबिटीज झाल्याचा इशारा, दुर्लक्ष केल्यास मृत्यूला पडू शकता बळी
ओवा
पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी ओवा एक रामबाण उपाय मानला जातो. यात असलेले औषधी गुणधर्म पचनक्रिया सुधारण्यास आणि अपचन, गॅस, ब्लोटिंग आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्यांपशु सुटका देण्यास मदत करतात. ओव्याचा नियमित वापर तुमच्या आरोग्यासाठी खूप फायद्याचा ठरू शकतो. यासाठी दोन चमचे ओवा पिठात मिसळा आणि त्याची चपाती बनवा. याने तुमची पचनशक्ती वाढेल आणि याचा तुमच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होईल.
अळशी
अळशी ज्याला फ्लॅक्स सीड्स म्हणूनही ओळखले जाते, हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यात फायबर, ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आणि अँटी-कॅन्सर घटक आढळले जातात. अळशीच्या या बिया हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते तसेच हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही अत्यंत फायदेशीर ठरते. यामुळे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहून डायबिटीज नियंत्रित राहते.
धणे
धणे पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते. हे ब्लड शुगर आणि इन्सुलिन पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. हे शरीरातील ग्लुकोजची पातळी देखील कमी करते. याची पावडर पिठात मिसळल्याने शरीराला आतून थंडावा मिळतो. पोटाच्या विविध समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही पिठात धणे मिक्स करू शकता.
हेदेखील वाचा – World Stroke Day 2024: सतत टेन्शनमध्ये असता? वेळीच सावध व्हा, ब्रेन स्ट्रोकची कारणे आणि निदान जाणून घ्या
सफेद तीळ
सफेद तिळामध्ये कॅल्शियम, प्रोटीन सारखे अनेक पोषक घटक आढळले जातात. हे हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त ठरतात. विशेषतः महिलांसाठी, मेनोपॉज नंतर हाडांची ताकद राखण्यासाठी तिळाचा आहारात समावेश करणे आवश्यक ठरते. पिठात सफेद तिळाचं समावेश केल्याने शरीराची एकूण कार्यक्षमता सुधारते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.