विटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे हाडांचा सांगाडा झाला असेल तर 'या' लाल पाण्याचे करा सेवन
दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीराला सर्वच विटामिनची आवश्यकता असते. पण शरीरात विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचते. शरीरात थकवा निर्माण होणे, अशक्तपणा, सतत तोंड येणे, हाडांमधील वेदना इत्यादी लक्षणे शरीरात दिसून येतात. धावपळीची जीवनशैली, कामाचा ताण, आहारात होणारे बदल, मानसिक तणाव इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर सुद्धा लगेच दिसून येतो. विटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे शरीरातील ऊर्जा कमी होऊन जाते. हाडांमध्ये वाढलेल्या वेदनांमुळे शरीरात सतत तणाव वाढतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर कोणत्या पेयांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पेयांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.(फोटो सौजन्य – istock)
CML आजार म्हणजे नक्की काय? भारतीय रुग्णांना ‘या’ गोष्टी माहीत असायलाच हव्यात
गाजर बीटचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. सकाळी उठल्यानंतर बीट गाजरचा रस प्यायल्यामुळे शरीरात साचून राहिलेली विषारी घटक बाहेर पडून जातील. रक्तातील पोषण द्रव्यात भर पडण्यासाठी गाजर बीटचे सेवन करावे. गाजरमध्ये फॉलिक ऍसिड, फायबर आणि जीवनसत्त्व अ इत्यादी अनेक घटक आढळून येतात. याशिवाय बीटमध्ये लोह आणि इतर खनिजे मोठ्या प्रमाणवर आढळून येतात. हा रस उपाशी पोटी घेतल्यास शरीराला अनेक पोषक घटक मिळतात.
लिंबूमध्ये असलेले विटामिन सी शरीरासाठी अतिशय महत्वाचे ठरते. याशिवाय आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकतात. शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी, कमी करण्यासाठी लिंबू आल्याच्या पाण्याचे सेवन करावे. या पाण्याच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. टोपात पाणी आणि आल्याचा किस टाकून व्यवस्थित उकळवून घ्या. त्यानंतर तयार केलेले पाणी गाळून त्यात लिंबाचा रस टाकून मिक्स करून सेवन करावे. या पाण्याचे सेवन प्रामुख्याने सकाळी किंवा दुपारी जेवणानंतर करावे.
डाळिंबामध्ये लोह आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. ज्यामुळे रक्तनिर्मितीस चालना मिळते. शरीरात निर्माण झालेली हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यासाठी डाळिंबाच्या रसाचे सेवन करावे. या रसाचे नियमित सेवन केल्यास शरीरावर सकारात्मक परिणाम दिसून येतील. विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यास डाळिंबाच्या रसाचे सेवन करावे.
व्हिटॅमिन B12 चे मुख्य फायदे कोणते आहेत?
हे ऊर्जा उत्पादन, DNA संश्लेषण आणि मज्जासंस्थेच्या कार्यांना समर्थन देते.
व्हिटॅमिन B12 ची कमतरता का होते?
पुरेसे व्हिटॅमिन B12 नसलेला आहार घेणे किंवा शरीराला व्हिटॅमिन B12 शोषून घेण्यात अडचण येणे यांमुळे कमतरता होते.
व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेची लक्षणे कोणती आहेत?
नैराश्य, थकवा आणि मज्जासंस्थेशी संबंधित समस्या (जसे की मळमळ) ही लक्षणांपैकी काही आहेत.