वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यसाठी काय खावे (फोटो सौजन्य - iStock)
शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयविकाराचा धोका असतो, पण बाजारात मिळणारी एक भाजी नक्कीच मदत करते. पण बरेच लोक ही भाजी खाण्यास टाळाटाळ करतात, त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही ही भाजी वेगळ्या पद्धतीनेदेखील खाऊ शकता.
आजकाल बरेच लोक त्यांच्या खाण्याच्या सवयींकडे लक्ष देत आहेत. मुळा ही अशी एक भाजी आहे ज्याचे सेवन अनेकदा केलेच जात नाही. पण मुळा तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. खराब कोलेस्टेरॉल वाढल्याने शरीरात हृदयरोगाचा धोका वाढतो. तसेच, मधुमेहाच्या रुग्णांसाठी मुळा खूप फायदेशीर आहे. मुळा खाऊन तुम्ही वजन कमी करू शकता, याचे अनेक फायदे तुम्ही या लेखातून जाणून घेऊ शकता (फोटो सौजन्य – iStock)
मुळ्यातील पोषक तत्व
उन्हाळ्यात अनेकदा कमी खावेसे वाटते तर पावसाळ्यातही कोणत्या भाज्या खायचा हा प्रश्न असतो, अशावेळी पाण्याने भरलेले मुळा खावे. कच्च्या भाज्या खाणे नेहमी चांगले ठरते. हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. शरीर निरोगी ठेवण्यासाठी डॉक्टर कच्च्या भाज्या खाण्याचा सल्ला देतात. यामध्ये मुळादेखील समाविष्ट आहे.
मुळा पोषक तत्वांनी समृद्ध आहे. त्यात कॅलरीज कमी असतात आणि फायबर, पोटॅशियम, जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. ते रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. मुळा आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि रक्ताभिसरणावर चांगला परिणाम करतो.
मुळ्याचे फायदे
मुळा खाण्याचे फायदे
मधुमेहाच्या रुग्णांसाठी मुळा खाणे खूप फायदेशीर मानले जाते. मुळा खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी बऱ्याच प्रमाणात नियंत्रित राहते. पण ते खाण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या. हवामान बदलत असताना आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर सर्वाधिक परिणाम होतो. तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात मुळा समाविष्ट करू शकता. मुळा खाल्ल्याने पचनसंस्था निरोगी राहते.
जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील तर तुम्ही तुमच्या आहारात मुळा समाविष्ट करू शकता. मुळा तुमची झोप सुधारण्यास मदत करू शकते. मुळा खाल्ल्याने निद्रानाश दूर होतो. मुळा कॅल्शियमने समृद्ध असतो. त्याचे सेवन हाडे मजबूत करण्यास मदत करते. मुळा खाल्ल्याने भूक वाढण्यास मदत होते. जर तुम्हाला कमी भूक वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात मुळा समाविष्ट करू शकता.
मुळ्याची कोशिंबीर
मुळ्याची कोशिंबीर ठरते फायदेशीर
साहित्य – मुळा, शेंगदाण्याची पूड, कांदा, मिरच्या, धणे, डाळिंबाचे दाणे, लिंबू, मीठ, चाट मसाला पद्धत – मुळा धुवा आणि पांढरा भाग किसून घ्या. पाने बारीक चिरून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरच्या आणि हिरवी धणे घाला. वर डाळिंबाचे दाणे आणि शेंगदाण्याची पूड घाला. वर लिंबू पिळून घ्या. चवीनुसार मीठ आणि चाट मसाला घाला. दुसऱ्या पद्धतीनेदेखील तुम्ही मुळ्याची कोशिंबीर करू शकता. मुळा किसून घ्या, त्यात मिरची, मीठ, दही घालून मिक्स करून खावे